यावर्षी कोरोना महामारीच्या काळातही अनेक जोडप्यांनी त्यांच्या नव्या वैवाहिक आयुष्याची सुरुवात केली. कठीण समयी देखील त्यांनी त्यांच्या आयुष्यातील आनंद शोधला आहे. मग अशा वेळी या शुभकार्यामध्ये सेलेब्रिटी कपल्सदेखील कसे मागे राहतील. याच वर्षी अनेक सेलब्रिटींनीदेखील त्यांच्या आयुष्याच्या नव्या इनिंगला सुरुवात केली.
या जोड्यांमध्ये नेहा कक्कर, काजल अग्रवाल, हार्दिक पांड्या, पुनीत पाठक या सिलिब्रिटीनंतर आता भारतीय संघाचा प्रमुख फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल याने सुद्धा युट्युबर आणि कोरियोग्राफर धनश्री वर्मा हिच्यासोबत स्वतःची लगीनगाठ बांधली.
दोन्ही कुटुंबांच्या आणि काही मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थिती हा विवाह सोहळा पार पडला. याचे फोटोजही आपण सगळ्यांनी मागील आठवड्यात पाहिले होते. यावर युझवेंद्र चहलवर चारही बाजूंनी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
युझवेंद्र आणि धनश्री हे सोशल मिडियावर सर्वाधिक ऍक्टिव्ह असणाऱ्या कपल्सपैकी एक आहे. लग्नाआधी देखील हे दोघेही शॉर्ट व्हिडियो बनवून सोशल मीडियावर टाकत होते. आधी आयपीएल आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियन दौरा असा दीर्घकाळ परदेश दौरा आटपून चहल भारतात परतला त्यानंतर थेट लग्नाच्या मांडवातच येऊन बसला.
या दोघांचे लग्नाचे फोटो त्यांनी शेअर केले. तसा दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव देखील झाला परंतु त्यांच्याच काही चाहत्यांना प्रश्न पडू लागले की या दोघांच्या लग्नातील इतर समारंभाचे फोटोज कुठे आहेत? परंतु धनश्री ने त्यांची तीही चिंता आता मिटवून टाकली आहे तिने हळू हळू त्यांच्या हळदी समारंभाचे आणि साखरपुड्याचे फोटोज सोशल मीडिया अकाउंटवर अपलोड केले आहेत.
धनश्री आणि युझवेंद्र या दोघांनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर साखरपुड्याचे फोटो अपलोड केले होते. ज्यामध्ये एका फोटोत दोघंही एकमेकांच्या अंगठ्या दाखवत आहेत. दुसऱ्या फोटो मध्ये धनश्रीने युझवेंद्रच्या खांद्यावर डोकं ठेऊन त्याला मिठी मारलेली पाहायला मिळतेय. तर पुढील काही फोटोंमध्ये धनश्रीच्या एकटीच्याच वेगवेगळ्या अदा आपल्याला पाहायला मिळतायत. या फोटोंमध्ये आपल्याला दोघांनीही एकमेकांना मॅचिंग अशीच आउटफिट
परिधान केलेली आपल्याला पाहायला मिळतेय.
यानंतर दोघांनीही त्यांच्या हळदी समारंभाचे फोटोज त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर अपलोड केले. या फोटोजमध्ये देखील दोघांनी मॅचिंग आउटफिट परिधान केली आहे. दोघांनाही त्यांचे नातेवाईक हळदी लावताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत.
काही फोटोजमध्ये दोघांवरही गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव होताना दिसतोय. तर काही फोटोजमध्ये आपल्याला या दोघांच्याही घरातील सदस्य तसेच मित्रपरिवारही पाहायला मिळत आहे.