मनोरंजन विश्वामधील 2022 हे वर्ष खूपच चांगलं अत्साहाचं आणि आनंदाचं गेलं आहे. त्याशिवया अनेक दिवसांपासून नात्यामध्ये असणाऱ्या सेलिब्रिटींनी आपल्या नत्याला लग्नाबेडीत अडकवलं आहे, तर अनेक गाजणाऱ्या कालारांच्या घरात आनंदाच्याही बातम्याही आल्या आहे. आलिया भट्ट ते बिपाशा बसू पासून या अभिनेत्रींच्या घरी लाहान पाहुण्याने आगमन झाले. तसेच तर आज आपण टीव्ही अभिनेत्रींविषयी जाणून घेणार आहोत ज्यांनी 2022 साली त्यांच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन झाले.
गुरमीत चौधरी- देबिना बनर्जी
टीव्ही आणि बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल म्हणून देबिना बनर्जी (Debina Banerjee) आणि गुरमित चौधरी (Gurmeet Chaudhary) यांच्या जोडीकडे पाहिलं जातं. 2022 हे वर्ष या जोडप्यासाठी डबल आनंदाचं होतं आणि यावर्षी हे जोडपं दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत. देबिनाने अवघ्या सात महिन्यानंतर तिने दुसऱ्या मुलिल जन्म दिला
निकितिन धीर- कृतिका सेंगर
तंगबली म्हणून प्रेक्षकांवर भुरळ घालाणारा प्रसिद्ध अभिनेता निकितिन धीर (Nikitin Dhir) याने 2014 साली टीव्ही अभिनेत्री कृतिका सेंगर (Kritika Sengar) हिच्यासबत लग्नगाठ बांधली आणि 12ल मे 2022 साली लग्नाच्या तब्बल 8 वर्षानंतर तिने एका चिमुरडीला जन्म दिला.
भारती सिंग- हर्ष लिंबाचिया
बॉलिवू़ड इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री भारती सिंग (Bharti Singh) हिने प्रसिद्ध लेखक हर्ष लिंबाचिया (Harsh Limbachia) याच्या सोबत 2017 साली लग्ना केले. भारतीच्या वजनामुळे तिला खूप लेकरांची वाट पाहावी लागली पण शेवटी तिने 2022 साली तिने पहिल्यांदा एका गोलूमोलू मुलाला जन्म दिला. म्हणजेच लग्नाच्या 5 वर्षानंतर भारती आणि हर्षला मुलाचा आई-बाबा बनण्याचे सुख लाभले.
पुजा बनर्जी आणि संदीप सेजवाल
‘कुंमकुम भाग्य’ फेम टीव्ही अभिनेत्री पुजा बनर्जी हिने मार्च 2022 साली एका चिमुरडीला जन्म दिला. पुजा आणि संदीप पहिल्यांदा आई-बाबा झाले असून त्यांनी त्यांच्या मुलीचे नाव सना सेजवाल असे ठेवले आहे. संदीप आणि पुजाचे लग्न 28 फेब्रुवरी 2017 साली झाले होते. पुर्ण 5 वर्षानंतर अभिनेत्रीच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन झाले.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जेव्हा विद्या बालनला भिकारी समजून एका व्यक्तीने हातात ठेवले सुट्टे पैसे; काही काम धाम करण्याचाही दिला होता सल्ला
स्वत:च्याच शरीराचा तिरस्कार करायची विद्या बालन, अडल्ट भूमिका साकारून रंगवल्या चर्चा