बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर हे आई-वडील झाले आहेत. बिपासाने एका मुलीला जन्म दिला आहे. बिपाशा आणि करणने छोट्या परीचं स्वागत केलं आहे. हे जोडपे खूप आनंदी आहे, कारण बिपाशाने ऑगस्टमध्ये खुलासा केला होता की, ती आणि करण मुलगी होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. ती आधीच बाळाला ‘ती’ म्हणून संबोधत होती.
माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत बिपाशा बसू म्हणाली, “आम्हाला जेव्हापासून मूल हवे होते, तेव्हापासून आम्हाला मुलीची अपेक्षा होती. मला माहित आहे की, मुल ही एक सुंदर भेट आहे आणि ती लिंगाची पर्वा न करता स्वीकारली पाहिजे. आणि विशेष म्हणजे आपण आपल्या मुलाला ‘शी’ म्हणतो. आम्ही जेव्हापासून बाळाचे नियोजन सुरू केले तेव्हापासून आम्हाला मुलगी हवी होती.
View this post on Instagram
करण आणि बिपाशाला पहिलेपासूनच पाहिजे हाेती लेक
बिपाशा बसू पुढे म्हणाली, “करण आणि मी सुरुवातीपासूनच स्पष्ट होतो की, आम्हाला मूल हवे आहे. इतका वेळ का लागला याची मला कल्पना नाही, पण माझ्यासाठी हीच योग्य वेळ आहे.” बिपाशाने तिची प्रेग्नेंसी खूप एन्जॉय केली आहे.
बिपाशाने इंस्टाग्रामद्वारे दिली आनंदाची बातमी
बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हरने यावर्षी ऑगस्टमध्ये चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती की, त्यांच्या घरी एक छोटा पाहुणे येणार आहे. बिपाशाने तिच्या बेबी बंपचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते. तिने खुलासा केला होता की, त्यांचे दोन जणांचे कुटुंब आता तीन जणांचे कुटुंब बनण्यास तयार आहे. यासोबतच त्यांनी चाहत्यांचे प्रेम आणि प्रार्थनांसाठी आभार मानले. (actress bipasa basu become mother as she welcomed baby girl)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ब्रेकींग! बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर बनले आई-वडील, अभिनेत्रीने दिला एका मुलीला जन्म
कर्करोगाशी लढत असलेल्या अभिनेत्रीची इमोशनल पोस्ट चर्चेत; म्हणाली,’टक्कल पडलेल्या मॉडेलचे फोटोशूट…’