Wednesday, July 3, 2024

‘तमाशा लाईव्ह’ चित्रपटातील सोनाली कुलकर्णीचा किल्लर लूक आला समोर, या भूमिकेत दिसणार अभिनेत्री

मराठी चित्रपट जगताची अप्सरा सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) गेले अनेक दिवसांपासून पतीसोबत परदेसवारी करताना दिसत होती. ज्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत होते. आता परदेसवारी संपवून मायदेशात परततेली सोनाली कुलकर्णी सध्या तिच्या आगामी तमाशा लाईव्ह या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. या चित्रपटसाठी उत्सुक असल्याची पोस्ट नुकतीच सोनालीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन केली होती.जी सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी संजय जाधव दिग्दर्शित तमाशा लाईव्ह या चित्रपटात झळकणार आहे. संगीत स्पेशल असलेल्या या चित्रपटातील अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा पहिला लूकही चाहत्यांसाठी दाखवण्यात आला आहे.ज्यामध्ये ती शेफालीच्या भूमिकेत दिसत आहे. लूक पाहून सोनालीच्या चाहत्यांनाही या बहुचर्चित चित्रपटाची चांगलीच उत्सुकता लागली आहे. हा चित्रपट १५ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकतेच चित्रपटाचे संगीत दिग्दर्शनही पुर्ण झाले आहे.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनेही आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन हा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने चित्रपटातील तिच्या लूकचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सोनाली ब्लेजर घालून वृत्तनिवेदिकेच्या भूमिकेत दिसत आहे.फोटोसोबत सोनालीने “ह्या क्षणाची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्युज घेऊन आलीये शेफाली ‘तमाशा LIVE’ 15 जुलै पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात,” असा कॅप्शन दिला आहे. सोनालीच्या या लूकला चाहत्यांची जोरदार पसंती मिळताना दिसत आहे.दरम्यान या बहचर्चित चित्रपटात  सोनाली कुलकर्णी, सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, पुष्कर जोग, हेमांगी कवी, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, मनमीत पेम, आयुषी भावे आणि भरत जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

हे देखील वाचा