‘आश्रम’ वेबसिरीजच्या चौथ्या सीझनमध्ये झळकणार नाना पाटेकर, काय आहे व्हायरल बातमी मागील सत्य

नाना पाटेकर (Nana Patekar) हे भारतीय सिनेजगतातील एक प्रतिभावान अभिनेते म्हणून ओळखले जातात. आपल्या दमदार अभिनयामुळे आणि आव्हानात्मक भूमिकांमुळे ते प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून नाना पाटेकर चित्रपटांमध्ये दिसले नाहीत. २०२० मध्ये आलेल्या इट्स माय लाईफ हा चित्रपटात ते शेवटचे झळकले होते. त्यानंतर ते सिने जगतापासून लांब आहेत. परंतु आता त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून नाना पाटेकर लवकरच प्रकाश झा यांच्या आश्रम वेबसिरीजमधून ओटीटी पदार्पण करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. काय आहे यामागील नेमके सत्य चला जाणून घेऊ. 

नाना पाटेकर यांनी मीडिया हाऊसशी संवाद साधताना खुलासा केला की ते आश्रमच्या चौथ्या सीझनमधून नाही तर लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘लाल बत्ती’ या वेब सीरिजमधून पुनरागमन करणार आहेत. या सिरीजमधूल नाना पाटेकर आणि प्रकाश झा पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. याआधी दोघांनी 2010 मध्ये आलेल्या ‘राजनीती’ चित्रपटात एकत्र काम केले होते. याबद्दल अधिक माहिती देताना नाना पाटेकर यांनी प्रकाश झा यांची ‘लाल बत्ती’ ही सामाजिक-राजकीय वेब सीरिज असल्याचे उघड केले. ज्यामध्ये राजकारणाची काळ्या बाजू उघडकीस येतील. या सिरीजमध्ये नाना पाटेकर एका राजकीय नेत्याच्या भूमिकेत दिसणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by Nana patekar (@nana.patekar)

‘आश्रम 3’ सोबतच निर्मात्यांनी पुढच्या सीझनचा टीझरही रिलीज केला आहे. त्यावरून ‘आश्रम 3’ नंतर आता त्याचा नवा सीझनही लवकरच प्रदर्शित होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या टीझरमध्ये बॉबी देओलच्या रुपात असलेला बाबा काशीपूरच्या लोकांसाठी देवापेक्षा कमी नाही. 1 मिनिटांच्या या टीझरमध्ये लोकांची गर्दी आहे आणि बाबा निराला यांची भव्य शैली आहे. सर्वजण बाबांचा जयजयकार करीत आहेत. सीझन 4 मध्ये पम्मी पहेलवान देखील दिसणार आहे, ज्याची झलक या टीझरमध्ये दिसते. पम्मी आश्रमात परतणार असून ती वधूच्या अवतारात दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Latest Post