भारत आणि न्यूझीलंडचे संघ टी-२० मालिकेनंतर दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी कानपूरला पोहोचले आहेत. दोन्ही संघांमधील पहिली कसोटी २५ नोव्हेंबरपासून ग्रीनपार्क मैदानावर सुरू होणार आहे. कर्णधार विराट कोहलीला या कसोटीतून विश्रांती देण्यात आली असून, त्याच्या जागी अजिंक्य रहाणे कर्णधारपद भूषवणार आहे. विराट पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघाचा भाग नसला, तरी त्याने आधीच सराव सुरू केला आहे. मात्र, त्याने हा सराव कानपूरमध्ये नाही, तर मुंबईत सुरू केला आहे. जिथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना ३ डिसेंबरपासून खेळवला जाणार आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये सराव सुरू असताना कोहलीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये एक मांजरही त्याच्या मांडीवर बसलेली दिसत आहे. ज्यावर बॉलिवूड अभिनेत्री आणि विराटची पत्नी अनुष्का शर्माने प्रतिक्रिया दिली आहे.
खरं तर, विराटने सराव सामन्यादरम्यान मांजरीसोबत खेळतानाचे दोन फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना विराटने लिहिले आहे की, “सरावात असलेल्या मस्त मांजरीकडून एक फटाफट नमस्कार.” कोहलीच्या या फोटोवर अनुष्काने मजेशीर कमेंट केली आहे. तिने लिहिले की, “हॅलो मांजर.” यानंतर कोहलीनेही पुढे मजेशीर उत्तर देत लिहिले, “दिल्लीचा मुलगा आणि मुंबईची मांजर.” त्याच्या या फोटोंना ५१ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
आईसीसी टी-२० विश्वचषक २०२१ पासून भारतीय वनडे आणि कसोटी संघाचा कर्णधार कोहली विश्रांतीवर आहे. या स्पर्धेनंतर त्याने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले. नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत तो संघाचा भाग नव्हता. कोहली दुसऱ्या कसोटीसाठी संघात सामील होणार आहे.
ब्रेक दरम्यान तो पत्नी अनुष्का आणि मुलगी वामिकासोबत वेळ घालवत आहे. याआधीही विराटने पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मासोबतचा स्वतःचा एक गोंडस फोटो शेअर केला होता, जो चाहत्यांना खूप आवडला होता. अनुष्का शर्मा देखील सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती देखील कुटुंबासोबतचे फोटो सतत चाहत्यांबरोबर शेअर करत असते.
अनुष्काबाबत बोलायचं झालं, तर अखेरच्या वेळेस २०१८ मध्ये ती शाहरुख खान आणि कॅटरिना कैफसोबत ‘झिरो’ चित्रपटात दिसली होती. यानंतर अनुष्काने आतापर्यंत कोणत्याही प्रकल्पाची घोषणा केलेली नाही. चाहते तिच्या पुढील चित्रपटाच्या घोषणेची वाट पाहत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-आहा कडकच ना! आयफेल टॉवरसमोर नेहा कक्करने रोहनप्रीतला केले लिप-लॉक किस, युजर म्हणाला, ‘सावधान…’