Saturday, August 2, 2025
Home बॉलीवूड देशभर स्वातंत्र्यदिनाचा जल्लोश, पण ‘या’ अभिनेत्यांनी बदलला नाही डिपी

देशभर स्वातंत्र्यदिनाचा जल्लोश, पण ‘या’ अभिनेत्यांनी बदलला नाही डिपी

७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या जल्लोषात संपूर्ण देश मग्न झाला आहे. या दिवशी लोक राष्ट्रध्वज फडकावून स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करतात. काहीजण ऐतिहासिक दिवसाच्या निमित्त्याने तिरंग्याचे छायाचित्र सोशल मीडियावर शेअर करत आहेत. त्याचवेळी बॉलीवूड कलाकार त्यांच्या ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाऊंटच्या डीपीवर तिरंग्याचे फोटो टाकून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत योगदान देत आहेत. मात्र, काही अभिनेते असे आहेत की ज्यांनी स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतरही डीपी बदललेला नाही. चला तर पाहूया या कलाकाराचे फोटो…..

कोणत्या कलाकारांनी तिरंगा पोस्ट केलं
बॉलीवूड आणि साऊथमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे सोशल मीडियावर फारसे सक्रिय नसतात. मात्र, स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करण्यासाठी आणि पंतप्रधानांच्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभागी होण्यासाठी त्यांनी केवळ सोशल मीडियावर तिरंगा पोस्ट केला नाही तर त्यांच्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाउंटच्या डीपीमध्येही तिरंगा ठेवला. या यादीत आलिया भट्ट (alia bhatt), कियारा अडवाणी, भूमी पेडणेकर, शाहिद कपूर, जॅकलिन फर्नांडिस, सोनू सूद, सारा अली खान, वरुण धवन, सलमान खान(Salman khan), आमिर खान, महेश बाबू यांसारख्या कलाकाराच्या नावांचा समावेश आहे.

‘या’ कलाकारांनी डीपी बदलला नाही
त्याचबरोबर असे काही बॉलीवूड कलाकार आहेत ज्यांनी इन्स्टाग्राम किंवा ट्विटरचा डीपी बदलला नाही. समंथा, प्रियांका चोप्रा, आयुष्मान खुराना, टायगर श्रॉफ (tiger shroff), अमिताभ बच्चन, प्रभास, करीना कपूर खान आणि अल्लू अर्जुन (Allu arjun) यांनी आज सकाळी १० वाजेपर्यंत त्यांच्या सोशल मीडिया डीपीमध्ये तिरंगा लावला नाही.

सोशल मीडियावर आवाज
चित्रपटांवर बहिष्कार टाकल्यानंतर आता सोशल मीडिया यूजर्स याविरोधात आवाज उठवत आहेत. काही जण त्यांचा डीपी बदलण्याच्या निर्णयाचे कौतुक करत आहेत, तर काहीजण अशा अभिनेत्यांना ट्रोल करत आहेत. ज्यांनी ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांच्या डीपीमध्ये तिरंगा चित्र लावला नाही. त्याचवेळी काही युजर्स सोशल मीडियावर अशी भूमिका घेत आहेत की डीपीमध्ये तिरंगा लावणे म्हणजे देशभक्ती नाही. त्यापेक्षा प्रत्येक गोष्ट करताना देशाची प्रतिमा डोळ्यासमोर ठेवणे हीच खरी देशभक्ती आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

पतीच्या निधनानंतर दोन महिन्यातच मीनाचा मोठा निर्णय, ‘हा’ अवयव करणार दान

‘देशातला द्वेष थांबवा’ अभिनेत्री तापसी पन्नूचे स्वातंत्र्यदिनी आवाहन, नेटकऱ्यांनी दिल्या ‘अशा’ प्रतिक्रिया

अक्षय कुमार बॉयकॉटवर बोललाच; म्हणाला, ‘लोकांच्या खोडसाळपणामुळेच देशाच्या अर्थव्यवस्थेची…’

हे देखील वाचा