Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

भारीच ना! ‘या’ अभिनेत्रींनी अभिनयासोबतच व्यवसायातही उमटवलाय आपला ठसा; वाचून तुम्हीही कराल कौतुक

महाराष्ट्रात ७ ऑक्टोबरपासून घरोघरी घटस्थापना झाली आहे. अशात स्त्री शक्तीचा जागर सर्वत्र पाहायला मिळतोय. सर्व देवींनी आपल्या मार्गातील अडथळे दूर करत या सृष्टीला चांगले जगजीवन दिले. अशाच पद्धतीने आजची स्त्री देखील स्वतः समाजातील घटकांच्या उपयोगी पडेल अशी कामे करत असते. सिनेसृष्टीमध्ये देखील अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत ज्यांनी अभिनयाने मनोरंजनासह इतर क्षेत्रांमध्ये देखील स्वतःचे नाव कमावले आहे. यातील काही अभिनेत्री आणि त्यांच्या व्यवसायाविषयी जाणून घेऊयात.

प्रिया बापट
प्रिया बापट ही एक यशस्वी मराठी अभिनेत्री असून एक उत्तम उद्योजिका देखील आहे. ती एका प्रोडक्शन हाऊसची मालकिन देखील आहे. प्रिया तिची बहिण श्वेताबरोबर ‘स्वेंची’ हे साड्यांचे ब्रँड देखील चालवते.

ट्विंकल खन्ना
अभिनेत्री ट्विंकल खन्ना सध्या जरी मनोरंजन विश्वात नसली, तरी तिने आधी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्रीसह ती एक उत्तम लेखिका देखील आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रामध्ये तिचा लेख देखील येतो. यासह तिनं अनेक पुस्तके देखील लिहिली आहेत.

जिनिलिया देशमुख
जिनिलिया देशमुख देखील एक उत्तम अभिनेत्री असून उत्तम उद्योजिकाही आहे. ‘इमॅजिन’ नावाची तिची एक फूड कंपनी देखील आहे. यामध्ये सर्व शाकाहारी पदार्थ मिळतात. विशेषतः हे सर्व पदार्थ रेडी टू कूक या संकल्पनेतून तिने तयार केले आहेत. हे पदार्थ खाताना जरी तुम्ही व्हेजिटेरिअन असाल तरी तुम्हाला नॉनव्हेज खाल्ल्याचा अस्वाद नक्की मिळेल. म्हणूनच तिने याचं नाव ‘इमॅजिन’ असं ठेवलं आहे.

तेजस्विनी पंडित/ विद्या भावे
तेजस्विनी पंडित आणि विद्या भावे या दोघींनीही अभिनयासह व्यवसायातही स्वतःची ओळख निर्माण केली आहे. या दोघींचा ‘तेजाज्ञा’ नावाचा साड्यांच्या एक ब्रँड आहे. यामध्ये तुम्हाला खणाच्या साड्या जास्त करून पाहायला मिळतील.

दीपिका पदुकोण
दीपिका पदुकोणने आजवर सिनेसृष्टीमध्ये अनेक यशस्वी चित्रपट दिलेले आहेत. बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिचं नाव आग्रहाने घ्यावं लागेल. तिचा देखील एक कपड्यांचा ‘ऑल अबाऊट यू’ नावाचा ब्रँड आहे. तसेच हा ब्रँड मिंत्रा नावाच्या वेबसाईटवर देखील उपलब्ध आहे.

अनुष्का शर्मा
बॉलिवूडमधील अभिनेत्री अनुष्का शर्मा ही देखील अभिनयासह एक उद्योजिका आहे. तिच्या स्वतःच्या मालकीचे एक प्रोडक्शन हाऊस देखील आहे. या प्रोडक्शन हाऊसमधून देखील ती खूप पैसे कमवते.

प्रियांका चोप्रा
अभिनेत्री प्रियंका चोप्राने अभिनयासह व्यवसायातही मोठे शिखर गाठले आहे. भारतासह परदेशातही तिचे अनेक व्यवसाय आहेत. अनेक मोठमोठ्या शहरांसह दुबईमध्ये देखील तिची एक रेस्टॉरंट फ्रॅंचायझी आहे.

सोनम कपूर
सोनम कपूर ही अभिनेत्री आणि मॉडेलसह एका फॅशन ब्रँडची मालकीण देखील आहे. ‘रेहजोन’ हे तिच्या ब्रँडचे नाव असून यामध्ये स्वस्त आणि सामान्य माणसाच्या खिशालाही परवडतील असे कपडे मिळतात. यासह ती फॅशनशी संबंधित वेगवेगळ्या गोष्टी लॉन्च देखील करत असते.

शिल्पा शेट्टी
शिल्पा शेट्टी देखील एक उत्तम उद्योजिका आहे. ‘सिग्नेचर’ या परफ्युम ब्रँडची ती स्वतः मालकीण आहे. शिल्पा ही स्वतः एक फिटनेस मॉडेल आहे.

त्यामुळे ती योगा आणि फिटनेसचे क्लासेस देखील घेते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-एकेकाळी अडखळत बोलणाऱ्या शरद केळकरने, आपल्या दमदार आवाजाने ‘बाहुबली’ला केले संपूर्ण भारतात प्रसिद्ध

-‘वास्तव’ सिनेमाची २२ वर्षे! २० मिनिटात लिहिलेल्या चित्रपटाला संजय दत्तने १५ मिनिटात दिला होता ‘होकार’

-‘मिठीत जाऊन तुझ्या मिटावे…’, स्पृहा जोशीच्या फोटोसोबत कॅप्शननेही वेधले चाहत्यांचे लक्ष

हे देखील वाचा