आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे, असं तुम्ही एकदा तरी म्हणाला असालच. खरंच आहे ना. आजकाल जवळपास प्रत्येकाकडे किमान एक तरी सोशल मीडियाशी जोडणारं ऍप असतंच. त्यामुळे या सोशल मीडियाच्या जगात आता कटेंट क्रिएटरला मोठा भावही आलाय बरोबर ना. तुम्हीही आशा कटेंट क्रिएटरला फॉलो करत असालच की. यातील अनेक कटेंट क्रिएटर एकटे काम करतात, तर काही आपल्या मित्रमंडिळींना घेऊन कामाला लागतात. मात्र, काही असेही आहेत बरं का आपल्या आयुष्यातील खऱ्याखुऱ्या जीवनसाथीला बरोबर घेत भन्नाट कटेंट क्रिएट करतात, तर कोणते आहेत असे हे भारी कपल्स, चला जाणून घेऊया…
गौरव तनेजा आणि रितू राठी
या यादीतली पहिली जोडी म्हणजे गौरव तनेजा आणि रितू राठी. खरंतर गौरव आणि रितू हे दोघेही पायलेट. त्या दोघांचं फ्लाईंग बिस्ट नावाचं युट्यूब चॅनेल आहे. याच नावाने दुसऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉमवरही त्यांचे अकाऊंट्स आहेत. यावर ते बिझी आयुष्यातूनही वेळ काढत आपल्या रोजच्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टी शूट करून पोस्ट करत असतात.
View this post on Instagram
अभिराज आणि नियती
सध्या सोशल मीडियावर प्रचंड गाजणारी जोडी म्हणजे अभिराज आणि नियती. आता तुम्ही म्हणाल हे कोण, हे कपल म्हणजेच अभि अँड नियू. आता सर्वांना पटकन लक्षात आलं असेल बरोबर ना, तर हे दोघेही कटेंट क्रिएटर आहेत. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असतात. अनेकदा ट्रेंडिग विषयावर ते त्यांची मतं मांडणारे किंवा वास्तव मांडणारे व्हिडिओ शेअर करत असतात. तसेच फक्त ट्रेंडिंगच नाही, तर सामन्यांना समजेल अशा भाषेत ते जगभरात घडलेल्या घटनांबाबत माहिती देत असतात.
View this post on Instagram
मुंजळ आणि विदीत तनेजा
तिसरी जोडी म्हणजे सावी मुंजळ आणि विदीत तनेजा. bruised passports या नावाने ते सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. हे कपल विविध देशांत फिरत असतं. हा प्रवास करताना त्यांना आलेले अनुभव ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. ते त्यांच्या प्रवासाबद्दल आणि हे जग फिरण्यासाठी प्रचंड पॅशनेट असून त्यांच्या पोस्टवरून दिसून येते. तसेच bruised passports या नावाने त्यांची वेबसाईटही असून यात त्यांनी विविध ठिकाणच्या प्रवासाबद्दल माहिती दिली आहे.
View this post on Instagram
आयुश मेहरा आणि आश्ना
आपली पुढची जोडी म्हणजे आयुश मेहरा आणि आश्ना. आयुष अनेकांना माहित आहे. कारण तो प्रसिद्ध कटेंट क्रिएटर असून त्याचे अनेक व्हिडिओ, शो सोशल मीडियावर दिसतात. आश्ना देखील इन्फुएंसर आणि मॉडेल आहे. या दोघांचे फोटो आणि व्हिडिओही अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
View this post on Instagram
किश्वर मर्चंट आणि सुयश राज
किश्वर मर्चंट आणि सुयश राय ही जोडीही या यादीत येते. हे दोघेही सोशल मीडियावर रोजच्या आयुष्यातील छोट्या छोट्या घटनांचे किंवा काहीतरी मजेशीर व्हिडिओ-फोटो शेअर करत असतात. तसेच सुयश रायचे युट्यूब चॅनेलही आहे. यावर तो त्याच्या गाण्यांचे व्हिडिओही टाकत असतो.
View this post on Instagram
उर्मिला निंबाळकर आणि सुकिर्त गुमास्ते
या यादीतील पुढची मराठमोळी जोडी म्हणजे उर्मिला निंबाळकर आणि सुकिर्त गुमास्ते. उर्मिला ही अभिनेत्री देखील आहे, पण अभिनयाबरोबरच ती तिचं युट्यूब चॅनेल चालवते. लाईफस्टाईल, मेकअप, ट्रॅवल अशा विविध विषयांवरील तिच्या व्हिडिओंना मोठा प्रतिसाद मिळतो.
View this post on Instagram
अनेकदा तिच्या या व्हिडिओंमध्ये सुकिर्तही दिसतो. तसेच सोशल मीडियावरही ही जोडी चांगलीच सक्रिय असते. त्यांच्या पोस्टला मोठ्या प्रमाणात प्रतिक्रियाही येतात.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बाप आणि त्याचं मुलांवरील प्रेम ‘या’ सिनेमांनी दाखवून दिलं, एका क्लिकवर घ्या जाणून
एकाला संधी मिळावी म्हणून घरातले सगळे तडफडतात, पण तिकडं गोविंदाच्या तीन पिढ्या गाजवतायत फिल्मइंडस्ट्री
एकाच धक्क्याने ‘या’ सेलिब्रिटींचा खेळ झाला खल्लास! कुणाचा डोळा गेला, तर कुणाच्या सौंदर्याला लागली नजर










