Wednesday, June 25, 2025
Home अन्य भारीच ना! ‘इंडियन आयडल’चे ‘हे’ स्पर्धक पोहचले लंडनला, चाहत्यांना दिली आगामी शोची माहिती

भारीच ना! ‘इंडियन आयडल’चे ‘हे’ स्पर्धक पोहचले लंडनला, चाहत्यांना दिली आगामी शोची माहिती

या वर्षी ‘इंडियन आयडल’चे १२ वे पर्व चांगलेच गाजले होते. देशाच्या कानकोपऱ्यात या शोचे नाव पोहचले आहे. या वर्षी पहिल्यांदा प्रेक्षकांच्या या शोवरील प्रेम पाहता हा शो तब्बल १० महिने चालला आहे. तसेच या शोचा ग्रँड फिनाले देखील १२ तास चालला होता. त्यामुळे या पर्वाने इंडियन आयडलच्या इतिहासात त्याचे नाव सोनेरी अक्षरांनी लिहून ठेवले आहे. या शोसोबत या शोमधील सगळे स्पर्धक देखील खूप चर्चेत आले आहेत.

या शोचा विजेता केवळ एकच झाला. परंतु शोमधील सगळ्याच स्पर्धकांनी प्रेक्षकांच्या मनात त्यांची अशी खास जागा निर्माण केली आहे. कारण सगळेच गायनात वरचढ आहेत. हा शो संपून बराच काळ झाला आहे. तरी देखील शोचे सगळे स्पर्धक कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. अशातच शोमधील काही स्पर्धकांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. (Indian ideol 12 contestant sayali kamble share a video and give information about Landon show )

सायली कांबळेने हा व्हिडिओ तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सायली, अरुणिता, दानिश आणि पवनदीप दिसत आहेत. ते तिघेही लंडनमध्ये एका शोमध्ये परफॉर्म करण्यासाठी गेले आहेत. त्यामुळे ते व्हिडिओद्वारे सगळ्यांना हा शो बघायला येण्यासाठी सांगत आहे. तसेच ते सगळे या शोसाठी खूप उत्सुक आहेत असे देखील त्यांनी सांगितले.

शनिवारी (३० ऑक्टोबर) हा शोमध्ये होणार आहे. त्यामुळे लंडनमधील लोकांना त्यांच्या आवडत्या गायकांना ऐकण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी सायलीने हा व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना ही बातमी दिली आहे.

या पर्वात पवनदीप राजन हा विजेता झाला आहे. तर अरुणिता कांजीलाल ही उपविजेती झाली आहे. शोमध्ये त्यांच्या अफेअरच्या चर्चा जोरदार चालू होत्या. परंतु त्यांनी या गोष्टीला नकार दर्शवून ते केवळ चांगले मित्र आहेत असे सांगितले होते. तसेच काही दिवसांपूर्वी त्या दोघांचे एक रोमँटिक गाणे प्रदर्शित झाले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘एकच वादा आमचा विशाल दादा’, दादूस यांनी विशालच्या सांगण्यावरून रागात गायले गाणे

-साप्ताहिक कार्यात मीराने मीनलला दिले ‘हे’ मोठे आव्हान, ऐकून सर्वच झाले स्तब्ध

-बिग बॉस मराठी: ‘जय वीरू’ची जोडी तुटणार? विशालने केले ‘असे’ कृत्य की, विकासला अनावर झाले अश्रू

हे देखील वाचा