Thursday, April 24, 2025
Home अन्य ओहो! ‘इंडियन आयडल १२’मध्ये अरुणिताने पवनदीपला दिली गोड शिक्षा, लाजून तोही झाला लाल

ओहो! ‘इंडियन आयडल १२’मध्ये अरुणिताने पवनदीपला दिली गोड शिक्षा, लाजून तोही झाला लाल

टीव्हीवरील प्रसिद्ध सिंगिंग रियॅलिटी शो ‘इंडियन आयडल १२’ मध्ये या आठवड्यात मुले विरुद्ध मुली अशी टक्कर पाहायला मिळणार आहे. या खास क्षणी शोमधील दोन मित्र पवनदीप आणि अरुणिता कांजिलाल एकमेकांना आव्हान देताना दिसणार आहेत. इतकेच नाही, तर अरुणिता यादरम्यान पवनदीपला एक शिक्षाही देणार आहे. तसं तर शिक्षा ही खूप वेदनादायक असते. परंतु अरुणिता पवनदीपला जी शिक्षा देणार आहे, ती खूपच गोड असणार आहे. यावेळी पवनदीपही लाजून लाल झालेला दिसणार आहे.

‘इंडियन आयडल १२’ मधील येत्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की, अनु मलिक अरुणिताला  म्हणत आहेत की, अरुणिता तू ठरवशील की, पवनदीपला काय शिक्षा दिली पाहिजे. अनु मलिकला प्रत्युत्तर देताना स्पर्धक अरुणिता पवनदीपला हसत हसत म्हणेल की, “मला याचे तोंड गोड करायचे आहे.” अरुणिताचे वक्तव्य ऐकून परीक्षक दंग होणार आहेतच, परंतु यादरम्यान पवनदीपही लाजून लाल झालेला दिसणार आहे. त्याला लाजलेला पाहून परीक्षक मनोज मुंतशिर त्याची थट्टा करताना दिसतील. ते म्हणतील की, “किती गोड शिक्षा मिळत आहे.”

पवनदीपला चारणार केक
या खास शिक्षेसाठी शोचा होस्ट आदित्य नारायण शोच्या टीमला एक गोड वस्तू मंचावर घेऊन येण्यास सांगेल. तसेच तो म्हणेल की, मंचावर एक शानदार केक आणला जाईल. केक पाहून आदित्यच्याही तोंडाला पाणी सुटेल. यासोबतच तो म्हणेल की, “पवनदीप एकटा शिक्षा भोगत आहे, हे मला बिल्कुलही आवडत नाहीये. त्यामुळे मीदेखील त्याच्यासोबत शिक्षा भोगत आहे.” असे म्हणत तोही नंतर केक उचलून खाताना दिसेल. मात्र, यामध्ये एक नवीन ट्विस्टही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

खरी शिक्षा असणार वेगळीच
खरं तर पवनदीपला केक चारणे अरुणिताची खरी शिक्षा नाहीये. त्याला केक चारण्याच्या बहाण्याने प्लेटमध्ये ठेवलेला केक त्याच्या चेहऱ्यावर लावणे अरुणिताची खरी शिक्षा आहे. त्यासाठी आधीच तिने आदित्यशी हात मिळवणी केली होती. जसे पवनदीप केक खाण्यात व्यस्त असतो, तेव्हाच आदित्य नारायण आणि अरुणिता मिळून त्याचा चेहरा केकमध्ये बुडवतील. केवळ पवनदीप आणि अरुणिताच नाही, तर शोमधील अनेक जोड्या आपल्या स्पर्धक जोडीदाराला या आठवड्यात अशीच शिक्षा देताना दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा