Friday, July 5, 2024

टीव्ही इतिहासात पहिल्यांदाच १२ तासांचा फिनाले प्रसारित, ‘इंडियन आयडल’च्या ६ शिलेदारांमध्ये टक्कर

टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये सर्वात जास्त गाजणार आणि चर्चेत असणारा सिंगिंग रियॅलिटी शो म्हणजे इंडियन आयडल. यावर्षी इंडियन आयडलचे १२ वे पर्व सुरू आहे. रविवारी (१५ ऑगस्ट) रोजी या पर्वाचा अंतिम भाग प्रसारित होत आहे. हा अंतिम भाग अजून ग्रँड पद्धतीने करण्यासाठी या शोने एक, दोन, नवे तब्बल बारा तास या फिनाले भागाचे प्रसारण करण्याचे ठरवले आहे. दुपारी १२ पासून सुरू झालेल्या या शोचा रात्री १२ वाजता अंतिम विजेता कोण हे घोषित केले जाणार आहे. आता पर्यंतच्या टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या रियॅलिटी शोचा शेवटचा भाग एवढ्या मोठ्या पद्धतीने दाखवण्यात येणार आहे. अनेक स्पर्धकांमधून सर्वात सुरेल आणि बेस्ट सहा स्पर्धक आज इंडियन आयडल हा किताब जिंकण्यासाठी एकमेकांशी भिडणार आहेत.

या शेवटच्या भागाला खास करण्यासाठी संगीत आणि अभिनय क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार पोहचणार असून, ते त्यांच्या सादरीकरणाने शोला चार चाँद देखील लावणार आहेत. सोनू कक्कड, हिमेश रेशमिया आणि अनु मलिक यांचे परीक्षण असलेल्या या शोला दहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर विजेता मिळणार आहे. स्पर्धकांसोबतच संपूर्ण देश देखील नक्की इंडियन आयडल कोण होणार हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे. (indian idol 12 finale biggest grand finale in indian history)

इंडियन आयडलच्या या १२ व्या पर्वात पवनदीप राजन, अरुणिता कांजिलाल, शनमुखप्रिया, दानिश खान, सायली कांबळे आणि निहाल हे सहा स्पर्धक एकमेकांच्या समोर उभे ठाकत आव्हान देणार आहेत. या सहा जणांपैकीच एक इंडियन आयडलची फायनल ट्रॉफी घरी घेऊन जाणार आहे.

तब्बल १२ तास चालणाऱ्या इंडियन आयडलच्या या १२ व्या पर्वाच्या अखेरच्या भागात प्रत्येक तासाला दर्शक १०० वोट्स करू शकणार आहेत. मागील दहा महिन्यांपासून सुरू असणारा हा शो रविवारी (१५ ऑगस्ट) संपणार आहे. कोण जिंकणार या बद्दल सर्वांमध्ये खूपच उत्सुकता आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-स्वातंत्र्यदिनानिमित्त चाहत्याने शेअर केला बिग बींचा ‘असा’ फोटो; ते पाहून अभिनेत्यालाही द्यावी लागली प्रतिक्रिया

स्वातंत्र्यदिन विशेष!! जेव्हा भारतातील ‘या’ चित्रपटांना घाबरला होता पाकिस्तान, थेट घातली गेली त्यावर बंदी

बॉलिवूडमधील असे कलाकार ज्यांना लाभलीय लष्करी पार्श्वभूमी; सुष्मितापासून ते प्रियांकापर्यंत ‘यांचा’ आहे समावेश

हे देखील वाचा