Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘इंडियन आयडल १२’मध्ये ‘मेरे रश्के कमर’ गाणं गायल्याने सोनू कक्कर ट्रोल; युजर्स म्हणाले, ‘मूळ गाण्याची…’

टीव्हीवरील सर्वात प्रसिद्ध आणि चर्चेत असलेल्या शोमध्ये ‘इंडियन आयडल १२’ या रियॅलिटी शोचं नाव घ्यावं लागेल. एकीकडे स्पर्धक आपल्या आवाजाने परीक्षक आणि प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घालत आहेत. दुसरीकडे शोचे निर्माते टीआरपीसाठी असे काही करतात, ज्यामुळे त्यांना प्रेक्षकांच्या रागाचा आणि ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. या शोचा हा हंगाम चांगलाच वादातून जात आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. या शोबद्दल प्रेक्षकांच्या मनात खूप सारे प्रश्न आहेत. सर्वात मोठा प्रश्न असा की, या शोमध्ये सुरुवातीला जे परीक्षक होते, ते आता कुठे आहेत? कधी अनु मलिक दिसतात, तर कधी मनोज मुंतशिर. नुकतेच या शोचा नवीन प्रोमो समोर आला आहे. या आठवड्यात नेहा कक्करची बहीण सोनू कक्कर आणि शब्बीर कुमार पाहुणे म्हणून पोहोचणार आहेत. मात्र, या प्रोमोमुळे पुन्हा एकदा हा शो ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे.

‘इंडियन आयडल’ शो पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर
प्रोमोमध्ये सुरुवातीला स्पर्धक सवाई भट्टचे गाणे ऐकायला मिळते. यानंतर काही वेळातच असे काही होते, जेणेकरून युजर्स सोनू कक्करला ट्रोल करू लागतात. काहींनी तर सोनूला चांगले न गाणाऱ्यांच्या यादीत सामील केले आहे.

नुकतेच या शोचा नवीन प्रोमो समोर आला आहे, जो चांगलाच चर्चेत आहे. या आठवड्यात शोची थीम ही ‘इंडिया की फर्माईश’ ठेवण्यात आली आहे. यामध्ये स्पर्धक चाहत्यांच्या विनंतीवर गाणे गाणार आहेत. या प्रोमोच्या सुरुवातीला स्पर्धक सवाई भट्टचे गाणे येते. त्यामध्ये तो ‘तूने क्या कर डाला मर गई मैं मिट गई मैं’ हे गाणे गाताना दिसतो. त्यानंतर काही वेळातच सवाई सोनूला म्हणतो की, मला एक गाणे तुमच्यासोबत गायचे आहे.

त्यानंतर सोनूही त्याच्या विनंतीला मान देत स्टेजवर जाते. दोघेही नुसरत फतेह अली खान यांचे ‘मेरे रश्के कमर’ गाणे गायला सुरुवात करतात. यानंतर युजर्स तिला ट्रोल करू लागतात. यावर प्रेक्षकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी सोनूसह शोच्या निर्मात्यांनाही चांगलेच सुनावले आहे.

सोनी टीव्हीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यावर काही युजर्सने कमेंट करत म्हटले की, “जगातील सर्वात वाईट कार्यक्रम आहे. हे संपूर्ण एक झोल आहे. सर्वजण मिळालेले आहेत.” दुसऱ्या एका युजरने प्रोमोमध्ये सवाईला पाहून म्हटले की, “कृपया अरुणिता आणि पवनदीपला आणा.” पुढे आणखी एका युजरने ‘मेरे रश्के कमर’ ऐकताच लिहिले की, “मूळ गाण्याची जी मजा आहे, तीसुद्धा खराब केली.”

खरं तर काही दिवसांपूर्वी या शोमध्ये किशोर कुमार यांचे सुपुत्र अमित कुमार आले होते. त्यांनी या शोवर आरोप लावला होता की, या शोमध्ये त्यांना स्पर्धकांची खोटी प्रशंसा करण्यास सांगितले गेले होते. यानंतर अनेक दिग्गज कलाकारांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तूच माझ्या जगण्याचा आधार’, सपना चौधरीच्या सुंदर व्हिडिओवर चाहत्याची प्रेमळ कमेंट

-‘पुन्हा शेपमध्ये येणं खरंच अवघड आहे का?’ नुकतंच मातृत्व अनुभवलेल्या धनश्री काडगावकरने स्त्रियांना केलं मोलाचं मार्गदर्शन

-या चिमुकलीला ओळखलं का? आज तिच्या ‘कॉमिक टायमिंग’साठी आहे प्रसिद्ध; तर प्रेक्षकांना पोट धरून हसायला पाडते भाग

हे देखील वाचा