‘पुन्हा शेपमध्ये येणं खरंच अवघड आहे का?’ नुकतंच मातृत्व अनुभवलेल्या धनश्री काडगावकरने स्त्रियांना केलं मोलाचं मार्गदर्शन

‘तुझ्यात जीव रंगला’ या सुप्रसिद्ध मालिकेतून अक्षया देवधर (पाठक वाई) आणि हार्दिक जोशी (राणा दा) यांना प्रचंड ओळख मिळाली. या कलाकारांसोबतच आणखी एक पात्र गाजलं ते म्हणजे वहिनीसाहेबांचं, अर्थातच धनश्री काडगावकर. प्रेक्षकांनी या पात्रालाही भरभरून प्रेम दिले. अभिनेत्री बऱ्याच दिवसांपासून छोट्या पडद्यापासून दूर आहे. कारण काही दिवसांपुर्वीच ती आई बनली आहे. टीव्हीपासून लांब असली, तरी धनश्री सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. सतत आपले फोटो पोस्ट करून ती चाहत्यांशी संबंधित राहण्याचा प्रयत्न करते.

आपले मातृत्व अनुभवत असलेल्या या अभिनेत्रीने नुकताच तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंसोबत तिने नुकत्याच आई बनलेल्या स्त्रियांना मोलाचे मार्गदर्शन केले आहे. हे फोटो धनश्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत, ज्यात ती आई बनल्यानंतर पुन्हा योग्य त्या आकारात येण्याबद्दल बोलताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Dhanashri Kadgaonkar (@kadgaonkar_dhanashri)

धनश्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर योगा करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत, तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “हे कठीण आहे का ?? खरंच हे आहे. परत आकारात येणे खरोखर अवघड आहे. कधीकधी मी स्वताला कमी लेखते. मला असंही वाटतं, मी ते गमावलं, माझी टोन्ड बॉडी गमावली आहे. पण मी एक जन्म दिला आहे आणि हे यापेक्षा कठीण आहे. बाळापासून वेळ काढणे कठीण आहे, व्यायामासाठी वेळ काढणे आणि झोपेसाठी तडजोड करणे कठीण आहे. पण मी करतेय आणि मला हे करायचे आहे. ”

पुढे अभिनेत्री म्हणाली की, “बाळाचं फिडींग, त्याच्या सोबत खेळणं, त्याला झोपवण, त्याचे ढीगभर कपडे वाळत टाकणं, आणि तेवढेच वाळलेले कपडे घडी करून नीट ठेवणं, मग आता झोपुया असं म्हणलं की बाळ परत उठलेलं असतं. हे सगळं करणारी मी एकटी नाहीय्ये. जगातल्या तमाम आई हे करतात, पण यातुन सुद्धा थोडा वेळ काढा स्वतःसाठी. डाॅक्टरांना विचारून तुमचा व्यायाम प्लॅन करा. खूप छान वाटेल. तर तुम्ही पण सुरु करा व्यायाम, आणि सांगा मला तुम्हाला कसं वाटतंय???” ही पोस्ट शेअर करत, तिने नुकत्याच मातृत्व अनुभवलेल्या आईंना व्यायामासाठी योग्यरीत्या प्रेरित केले आहे. नेटकऱ्यांनाकडून तिच्या पोस्टला भरभरून प्रेम मिळताना दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रेग्नंसीच्या वृत्तांमध्ये समोर आला अभिनेत्रीचा बेबी बंपसोबतचा पहिला फोटो; ६ महिने गरोदर असल्याचा दावा

-‘ट्रॅजेडी किंग’ दिलीप कुमार यांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज; नेहमीप्रमाणेच सायरा बानो यांची होती त्यांना साथ

-‘मीच माझ्या स्वप्नातली स्त्री!’, भाग्यश्री मोटेच्या हॉट ऍंड ब्यूटीफुल फोटोसोबतच लक्षवेधी कॅप्शनही आलं चर्चेत

Latest Post