Saturday, October 18, 2025
Home अन्य ‘इंडियन आयडल १२’मधील सवाई भट्टनंतर खुलले मोहम्मद दानिशचे भाग्य; हिमेश रेशमियाकडून मिळाली ‘ही’ भेट

‘इंडियन आयडल १२’मधील सवाई भट्टनंतर खुलले मोहम्मद दानिशचे भाग्य; हिमेश रेशमियाकडून मिळाली ‘ही’ भेट

टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये या ना त्या कारणांमुळे गाजणारा शो म्हणजे ‘इंडियन आयडल १२’ होय. जेव्हापासून गायक अमित कुमारांनी या शोवर आरोप लावले तेव्हापासूनच हा शो वादांमध्ये अडकायला सुरुवात झाली आहे. पाहुणे म्हणून आलेल्या कलाकारांनी लावलेल्या आरोपांमुळे हा शो गाजत असताना दुसरीकडे या शोमधील काही स्पर्धकांसाठी सर्वात जास्त आनंद घेऊन आला आहे. हळू हळू हा शो त्यांचा शेवटच्या भागाकडे सरकत आहे. शो संपण्यासाधीच स्पर्धकांसाठी भरभरून आनंद घेऊन आला आहे.

काही दिवसांपूर्वीच या शोचा परीक्षक असलेल्या हिमेश रेशमियाने त्याच्या आगामी म्युझिक अल्बम असलेल्या ‘हिमेश के दिल से’मध्ये या शोमधील स्पर्धक असलेल्या मोहम्मद दानिशला ब्रेक दिला आहे. याबद्दल माहिती स्वतः हिमेशने इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत दिली आहे.

हिमेशने त्याचा आणि दानिशचा एक फोटो पोस्ट करत लिहिले, “एका मागोमाग एक ब्लॉकबस्टर्ससाठी तुमचे खूप खूप आभार. मी स्वतः संगीत दिलेल्या ‘हिमेश के दिल से’ या अल्बममधील एका गाण्यातून मी अजून एक प्रतिभावान गायक मोहम्मद दानिशला लाँच करत आहे. ‘हिमेश के दिल से’ या अल्बममधील दुसरे गाणे दानिश गाणार आहे. लवकरच या अल्बमच्या प्रदर्शनची तारीख आम्ही जाहीर करू. तोपर्यंत आमच्यावर तुम्ही असेच प्रेम करत राहा.”

एका मुलाखतीमध्ये दानिशबद्दल बोलताना हिमेश म्हणाला, “मला आणि प्रेक्षकांना दानिशचे गाणे नेहमीच आवडत असते. मी त्याच्या गायनाने अतिशय समाधानी आहे. मला विश्वास आहे की, जसे पवनदीप, अरुणिता आणि सवाई भट्ट यांनी जसे माझ्यासाठी उत्तम गाणे गेले तसे दानिश देखील नक्की गाणार.”

तत्पूर्वी हिमेशने याच शो मधील स्पर्धक असलेल्या पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलाल यांना ‘मूड्स विद मेलोडीज’मधील ‘तेरे बगैर’ या गाण्यातून लाँच केले होते आणि हे गाणे तुफान हिट झाले. याशिवाय त्याने सवाई भट्टला देखील ‘हिमेश के दिल से’ अल्बममधील ‘सांसें’ गाण्यातून लाँच केले. या गाण्याला २ दिवसातच यूट्यूबवर १० मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

यासोबतच या शोमधील आशिष कुलकर्णीला देखील आदित्य नारायण लवकरच लाँच करणार आहे, याची माहिती खुद्द आदित्य नारायणने दिली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-इतिहासातील सोनेरी पान : बाजीप्रभूंच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या ‘पावनखिंड’ चित्रपटाचं पहिलं पोस्टर रिलीझ

-अली गोनीकडे सध्या नाहीये कोणताच प्रोजेक्ट; वाढलेलं वजन आहे का यामागचं कारण??

-‘मी अंतर्वस्त्र घालायचे की नाही, ही माझी चॉईस…’, कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना हेमांगी कवीने दिली जोरदार चपराक

हे देखील वाचा