‘इंडियन आयडल’ हा टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय आणि सर्वच वयोगटातील आवडता सिंगिंग शो आहे. सध्या या शो चे १२ वे पर्व सुरू आहे. या पर्वाची त्याच्या अंतिम फेरीकडे वाटचाल सुरू आहे. लवकरच या देशाला त्यांचा नवा इंडियन आयडल मिळणार आहे. तत्पूर्वी या शोमध्ये प्रत्येक आठवड्यात अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली आहे. अगदी आशा भोसले, प्यारेलालजी यांच्यापासून ते झीनत अमान, जावेद अख्तर यांच्यापर्यंत अनेकांची नावे या यादीत आहेत.
या शोच्या येणाऱ्या भागात बॉलिवूडमधील नव्वद आणि दोन हजारचे दशक गाजवणारी अभिनेत्री करिश्मा कपूर हजेरी लावणार आहे. या भागाचे प्रोमो सध्या सोशल मीडियावर आणि टीव्हीवर दाखवले जात आहेत. यावेळी सर्व स्पर्धकांनी करिश्माची हिट गाणी गायली. ‘इंडियन आयडल १२’ चा प्रतिभावान आणि विजयाचा पक्का दावेदार समजल्या जाणाऱ्या पवनदीप राजनने करिश्मा कपूरचे ‘दिल जाने जिगर’ आणि ‘तुमसा कोई प्यारा कोई मासूम’ हे दोन गाणी गायली. या परफॉर्मन्स दरम्यान एक सर्वात लक्षवेधी गोष्ट घडली.
पवनदीप त्याचे सादरीकरण करत असताना त्याने अचानक मध्येच करिश्माला स्टेजवर बोलावले. मग त्याने त्याचे पुढचे सादरीकरण केले. या परफॉर्मन्सनंतर करिश्माने त्याचे खूप कौतुक केले. यावेळी ती म्हणाली, “तू खूपच निरागस आणि विनम्र आहेस आणि तुझे हेच गुण तुझ्या गाण्यात देखील दिसतात. तू मला माझ्या जुन्या दिवसांची आठवण करून दिलीस आणि त्या दिवसांमध्ये मला घेऊन गेलास.”
‘इंडियन आयडल’मध्ये अगदी पहिल्या दिवसापासूनच सर्व परीक्षकांचा पवनदीप आवडता स्पर्धक आहे. सोबतच त्याने आतापर्यंत आलेल्या सर्व पाहुण्यांचे त्याच्या गाण्याने मन देखील जिंकले आहे. आता या यादीत करिश्मा कपूरचे देखील नाव जोडले गेले आहे.
पवनदीपने त्याच्या सादरीकरणानंतर सांगितले की, “मी लहानपासूनच करिश्मा कपूरचा फॅन आहे. त्या मला मला खूप आवडतात. त्या एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम डान्सर देखील आहेत. मी त्यांना माझ्या परफॉर्मन्सच्या मध्येच स्टेजवर बोलावले आणि त्या आनंदाने आल्या देखील. त्यांना माझे गाणे आवडले याचा मला खूप आनंद आहे.”
‘इंडियन आयडल १२’चा फिनाले १५ ऑगस्ट रोजी होणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-