Tuesday, July 9, 2024

दिग्गज भारतीय राजकारणी, ज्यांच्या पत्नींचे राहिलंय मनोरंजन विश्वात योगदान

महाराष्ट्रात सध्या कोणती चर्चा सर्वाधिक होत असेल तर ती राजकारणाचीच. रोज नवीन वळण राज्यातील राजकाराणाला मिळताना दिसतंय. तसं तर राजकारण हा विषय भारतात तरी कधीच जुना किंवा मागे पडलेला विषय होऊ शकत नाही. कट्ट्याकट्ट्यांवर अशी माणसं तर आढळतातच जे एकतर क्रिकेटबद्दल नाहीतर राजकारणाबद्दल चर्चा करत असतात. तसंही आता राजकारणीही सेलिब्रेटींपेक्षाही काही कमी नाही. सोशल मीडियावर तर त्यांचे व्हिडिओ सारखे व्हायरल होतंच असतात. त्यामुळे आता असं म्हणायला काय हरकत नसावी की राजकारणात ग्लॅमर यायला लागलंय. पण तुम्हाला माहिती आहे का की भारतातील काही राजकारणी मंडळी अशीही आहेत, ज्यांच्या अर्धांगिनी कलाकार आहेत. तर मंडळी आता राजकारण सध्या एकदम गरम विषय आहेच आणि आपण नेहमीच मनोरंजनाबद्दल बोलत असतोच, तर आता या दोन्हींना जोडणाऱ्या विषयाकडे जाऊयात. म्हणजेच आज आपण त्या राजकारणी व्यक्तींबद्दल जाणून घेऊ ज्यांच्या पत्नीनी मनोरंजन क्षेत्रात काम केले आहे.

या यादीतील पहिले नाव म्हणजे रवी राणा आणि नवनीत राणा. सध्या तुम्ही या दोघांचे नाव राजकाराणासाठीच ऐकत असाल. पण खरंतर नवनीत या दाक्षिणात्य अभिनेत्री आहेत. त्यांनी ज्यूनियर एनटीआर, विजयकांत अशा अभिनेत्यांबरोबर कामही केले आहे. पण आता त्या खासदार असून राजकारणात सक्रिय आहेत. तसेच रवी राणा तीनवेळा अमरावतीतून अमदार म्हणून निवडून आले असून, ते सुरुवातीपासूनच राजकारणात आहेत. या दोघांच्या लग्नासाठी बाबा रामदेव यांनी मोलाचा वाटा उचलला होता. रवी आणि नवनीत राणा यांनी २०११ मध्ये लग्न केले होते. सध्या हे दोघंही राजकारणात सक्रिय आहेत.

आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर ही जोडीही या यादीत आहे बरं का. आता तुम्ही म्हणाल ही जोडी तर मनोरंजन क्षेत्रातील आहे. पण मंडळी आदेश बांदेकर हे फक्त अभिनेते आणि निवेदक नाही, तर राजकारणी देखील आहेत. २००९ साली त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला होता. तसेच माहिममधून निवडणूकही लढवली होती. ते अनेकदा शिवसेना पक्षाला पाठिंबाही देताना दिसत असतात. तर त्यांची पत्नी सुचित्रा बांदेकर या चांगल्या अभिनेत्री असून अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमधून दिसत असतात.

अशीच आणखी एक जोडी म्हणजे शत्रुघ्न सिन्हा आणि पुनम सिन्हा. बॉलिवूडमधील मोठे नाव असलेले शत्रुघ्न सिन्हा हे एक राजकारणी देखील असून ते सध्या खासदार आहेत. पश्चिम बंगालमधील असनसोळ मतदार संघाकडून ते निवडून आलेत. गेल्या अनेक वर्षापासून ते राजकारणात सक्रिय आहेत. तर त्यांची पत्नी पुनम या देखील आता राजकारणात सक्रिय झाल्या असून त्यांनी यापूर्वी त्यांनी काही चित्रपटांमध्ये कोमल या नावाने काम केले आहे. शत्रुघ्न यांच्यासह देखील त्या सबक चित्रपटात दिसल्या होत्या. पण १९८० मध्ये लग्न झाल्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रातून काही काळ ब्रेक घेतला. त्या २००८ मध्ये जोधा अकबर चित्रपटातून त्यांनी पुनरागमन केले होते.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस हे सध्या देखील राजकारणात सक्रिय आहेत. विधानसभेत ते सध्या विरोधी पक्षनेते आहेत. तर त्यांची पत्नी अमृता फडणवीस या गायिका असून त्यांची अनेक गाणी चर्चेचा विषयही ठरत असतात. त्यांच्या गाण्यांचे व्हिडिओही अनेकदा व्हायरल होत असतात.

याशिवाय काँग्रेस नेते मिलिंद देवोरा यांची पत्नी पुजा शेट्टी देवोरा या फिल्म प्रोड्यूसर आहे. इतकंच नाही तर अमदार धीरज देशमुख यांची पत्नी दीपशिखा देशमुख या देखील फिल्म प्रोड्यूसर आहेत.

हेही वाचा –

‘या’ व्यक्तींचं नशीब फळफळलं! स्वत:मधील कलेने रातोरात बनले स्टार

अश्लीलतेचा कळस होते ‘या’ चित्रपटांचे पोस्टर, पैशासाठी कलाकारांनी सोडली लाज

बिग बॉसच्या घरात जमलं यांचं! या जोड्यांनी गाजवलंय बिग बॉस

हे देखील वाचा