Monday, July 1, 2024

इंडियाज गॉट टॅलेटमधील दिव्यांश आणि मनुराज यांच्या परफॉर्मन्सने रोहित शेट्टी झाला प्रभावित, थेट दिली सिनेमाची ऑफर

सोनी टिव्ही वर बहुचर्चेत रियालिटी शो म्हणजे इंडियाज गॉट टॅलेट. त्यामध्ये अनेक कलाकार त्यांच्या कलेने प्रेक्षकांवरती छाप पाडतात. या शोमध्यले स्पर्धक दिव्यांश आणि मनुराज या जोडीने  त्यांच्या जबरदस्त टॅलेटने प्रेक्षकांचे अमाप प्रेम मिळवत आहेत. ५ मार्च रोजी या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणुन रोहित शेट्टीने हजेरी लावली होती. रोहित शेट्टीच्या उपस्थितीत स्पर्धकांनी ‘ये मेरा दिल प्यार का दीवाना’, ‘गोलमाल’ आणि ‘आंख मारे’ अश्या गाण्यावर त्यांची कला सादर करताना दिसले. त्यांची प्रभावशाली कला पाहुन जज शिल्पा शेट्टी, किरण खेर, बादशाह, मनोज मुंतशिर आणि प्रमुख अतिथी रोहित शेट्टी थक्क झाले. दिव्यांश आणि मनुराज याचं नशीबच उघडले म्हणायचं, शो संपण्याच्या आधीच त्या दोघाना रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ या येणाऱ्या आगामी चित्रपटाच्या थीम सॉन्गमध्ये बादशाहसोबत गाण्याची संधी मिळाली आहे. 

दिव्यांश आणि मनुराज यांनी त्यांच्या जबरदस्त सादरीकरणाने मंचावरती मोठा धुराळा उडवला. सर्व परीक्षकांनी त्यांना त्यांना स्टँडिंग ओवेशन देखील दिले. गोष्ट इथेच संपत नाही यादरम्यान आइजीटीच्या सर्वात वरिष्ठ परीक्षक असणाऱ्या किरण खेर यांनी त्यांना गोल्डन बझर देत थेट पुढच्या फेरीसाठी निवडले आहेत. त्याच्या दोघांच्या सादरीकरणाने पाहुणा परीक्षक म्हणून आलेला रोहित शेट्टी सुद्धा खूप प्रभावित झाला आणि त्याने सांगितले की, या दोघांमुळे त्याची संध्याकाळ अधिक खास झाली. एवढेच नाही तर त्याने दिव्यांश आणि मनुराज या दोघांना त्याच्या आगामी ‘सर्कस’ या सिनेमाच्या थीम सॉन्गमध्ये बादशाहसोबत गाण्याची संधी दिली आहे. या दोघांसाठी ही सर्वात मोठी संधी असून, हे ऐकताच त्या दोघांनी रोहितचे आभार देखील मानले.

या दोघांच्या सादरीकरणानंतर किरण खेर म्हणाल्या की, “तुम्ही दोघांनी एवढी सुंदर तुमची कला सादर केली की, मला हा परफॉर्मस चालू असताना २ मिनटाच्या आतच गोल्डन बझर द्यायचा होता, आणि तिथे उभे राहून नाचायचे होते. मला तुमच्यात शामिल व्हायचे होते. मी तुम्हाला सांगू इच्छिते की, तुम्ही खूप परफॉर्मस दिले परंतु हा परफॉर्मस खूपच वेगळा आणि सरस होता. तुमचा प्रत्येक परफॉर्मन्स मागच्या परफॉर्मन्सपेक्षा चांगला असतो आणि हा सर्वोत्तम होता. तुम्ही इतके उत्तम आहात की, आमचं भाग्य म्हणायचे की तुम्हाला बघू शकतो आणि ऐकू शकतो.” तर शिल्पा शेट्टीने देखील या दोघांच्या जोडीचे खूप कौतुक केले आहे. ती म्हणाली की,“तुम्ही दोघं इंडियाज गॉट टॅलेंट”च्या मंच्यावरची एक जादुई टीम आहात.” रोहित शेट्टीच्या सर्कस या चित्रपटात रणवीर सिंग प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा 

हे देखील वाचा