Friday, April 18, 2025
Home टेलिव्हिजन ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ शोमधून धक्कादायक बातमी! स्पर्धकाच्या डोक्याला लागली आग, पाहून शिल्पा-किरणलाही शॉक

‘इंडियाज गॉट टॅलेंट’ शोमधून धक्कादायक बातमी! स्पर्धकाच्या डोक्याला लागली आग, पाहून शिल्पा-किरणलाही शॉक

अनेक टीव्ही शो तरुणांना आपली प्रतिभा जगापुढे दाखवण्याची संधी देतात. मात्र, यादरम्यान स्पर्धक असे काही सादरीकरण करतात, जे पाहून परीक्षकांच्याही भुवया उंचावल्याशिवाय राहत नाहीत. असेच काहीसे रियॅलिटी शो ‘इंडियाज गॉट टॅलेंट’मध्ये पाहायला मिळाले. यादरम्यानचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत स्पर्धकांचे स्टंट पाहून परीक्षकही हैराण होतात. यावेळी त्यांची रिऍक्शन अगदी पाहण्यासारखी असते.

खरं तर, ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ (Indias Got Talent) हा शो नवीन हंगामाद्वारे पुनरागमन करत आहे. यावेळी शोचे परीक्षक किरण खेर, शिल्पा शेट्टी आणि बादशाह आहेत. नुकतेच सोनी टीव्ही (Sony TV) चॅनेलच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. यामध्ये स्पर्धक हैराण करणारे स्टंट करताना दिसत आहेत. हे खतरनाक स्टंट पाहून तिन्ही परीक्षकांच्या चेहऱ्याचा रंग उडताना दिसत आहे.

खतरनाक स्टंट
नुकतेच शोचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये परीक्षकांच्या भूमिकेत असलेले किरण खेर, शिल्पा शेट्टी आणि बादशाह दिसत आहेत. तिघेही कंबर कसून प्रतिभेची निवड करण्यासाठी बसलेले असतात. त्याचवेळी स्पर्धक एकापाठोपाठ एक असे अनेक स्टंट करून सर्वांना हैराण करतात. या व्हिडिओत एक असे ऍक्ट आहे, ज्यात एका व्यक्तीच्या डोक्यावर आग लागलेली दिसते. ही आग तो एका पाण्याच्या बॉटलने स्वत:च विझवताना दिसतो. मात्र, यामागील सत्यता शोचा प्रीमिअर झाल्यावरच समोर येईल.

परीक्षकांची रिऍक्शन
मात्र, हे स्टंट पाहून तिन्ही परीक्षक खूपच हैराण होतात. शिल्पा शेट्टी इतकी हैराण होते की, ती आपल्या हातांनी तोंड बंद करते. तसेच, किरण खेर हा स्टंट पाहून भुवया उंचावतात. तसेच, बादशाह त्याचे डोळे बंद करून घेतो. मात्र, तो परीक्षक असल्यामुळे हा स्टंट आपल्या बोटांच्या मधून एका डोळ्याने पाहतो. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (indias got talent judge shilpa shetty to kiran kher all scared to see a contestant act see video)

महत्त्वाच्या बातम्या-
‘अनेक पाकिस्तानी महिलांचे पती भारतीय…’, सीमा हैदरला पाठिंबा देत प्रसिद्ध कलाकाराचे खळबळजनक भाष्य
इकडे रणवीर शर्टलेस झाला अन् तिकडे दीपिकाच्या कमेंटने लुटली वाहवा, दोघांनी वाढवले इंटरनेटचे तापमान

हे देखील वाचा