Thursday, June 13, 2024

इकडे रणवीर शर्टलेस झाला अन् तिकडे दीपिकाच्या कमेंटने लुटली वाहवा, दोघांनी वाढवले इंटरनेटचे तापमान

सध्या हिंदी सिनेसृष्टीत एका सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. तो सिनेमा इतर कुठला नसून आलिया भट्ट आणि रणवीर सिंग अभिनित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी‘ आहे. हा सिनेमा या आठवड्यात चित्रपटगृहांमध्ये एन्ट्री करण्यासाठी सज्ज झाला आहे. अशात चाहत्यांमध्ये सिनेमाची क्रेझ वाढवण्यासाठी रणवीर सिंग याने एक प्रोमो व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो शर्टलेस दिसत आहे. त्याच्या या व्हिडिओवर पत्नी आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण हिनेही कमेंट केली आहे.

रणवीर सिंग शर्टलेस
खरं तर, मागील रणवीर सिंग न्यूड फोटोशूट (Ranveer Singh Nude Photoshoot) करून भलताच चर्चेत आला होता. त्याला पाठिंबा देण्यासाठी अनेक कलाकारांनी तसेच फोटोशूट केले होते, तर काहींनी त्याच्या या फोटोशूटला कडाडून विरोध दर्शवला होता. अशात रणवीर सिंग (Ranveer Singh) याने त्याच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ सिनेमाच्या प्रोमोने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या व्हिडिओत रणवीर शर्टलेस आहे आणि आपला जिम वर्कआऊट दाखवत मंडे मोटिवेशनसाठीही लोकांना प्रेरित करत आहे.

सोमवारी (दि. 24 जुलै) रणवीरने चाहत्यांसाठी त्याच्या सिनेमातील पात्र रॉकी रंधावाच्या ‘मंडे मोटिवेशन’चा नवीन प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये रणवीरने शर्टलेस अवतारात इंटरनेटचे तापमान वाढवले आहे.

जिम करताना दाखवले सिक्स पॅक
या व्हिडिओची सुरुवात रणवीरच्या झोपेतून उठण्याने होते. तसेच, बॅकग्राऊंडला ‘मुंडे देसी’ गाणे वाजते. व्हिडिओत रणवीर जिममध्ये जाऊन वर्कआऊट करत आपले सिक्स पॅक ऍब्ज दाखवतो. या व्हिडिओत रणवीरचे अनेक क्लोज-अप शॉट्स आहेत, जे त्याच्या चाहतींना घायाळ करत आहेत. व्हिडिओत तो स्वत:ला आरशात पाहतो आणि वेगवेगळे पोहझी देत आहे. तो शॉवर घेतानाही दिसतो आणि कपड्यांपासून त्याच्या चष्म्यापर्यंतचे डिझायनर कलेक्शन दाखवतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

दीपिकाची मजेशीर कमेंट
रणवीरच्या या व्हिडिओवर चाहत्यांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये रणवीरची पत्नी दीपिका पदुकोण (Deepika Padukone) हिच्या नावाचाही समावेश आहे. दीपिकाने या व्हिडिओवर आकर्षण दाखवणारा इमोजी कमेंट केला आहे. याव्यतिरिक्त एकाने लिहिले की, “यामधून मला निश्चितच प्रेरणा मिळाली आहे.” आणखी एकाने लिहिले की, “हॉटनेस अलर्ट.”

कधी होणार रिलीज?
‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) सिनेमा येत्या शुक्रवारी (दि. 28 जुलै) रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन करण जोहर याने केले आहे. या सिनेमाचे बजेट 160 कोटी रुपये असल्याचे बोलले जात आहे. आता हा सिनेमा रिलीजनंतर बॉक्स ऑफिसवर काय धमाल करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (rocky aur rani ki prem kahani new promo actor ranveer singh shirtless look and muscular body see here)

महत्त्वाच्या बातम्या-
फक्त ‘या’ कारणासाठी शर्लिनसोबत नात्यात होता राजकारण्याचा मुलगा, भेटवस्तू देऊन अभिनेत्रीशी…
धक्कादायक! शरीराचा ‘हा’ पार्ट मोठा करण्यासाठी उर्फीने ओलांडलेल्या सर्व मर्यादा, फोटो पाहून चक्रावून जाल

हे देखील वाचा