Saturday, June 29, 2024

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार श्रेणीतून इंदिरा गांधी-नर्गिस दत्तचे नावं वगळले, जाणून घ्या नवीन बदल

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा देशातला मानाचा चित्रपट पुरस्कार मानला जातो. या पुरस्कारांच्या श्रेणीतला एक पुरस्कार इंदिरा गांधी यांच्या नावे तर एक पुरस्कार नर्गिस दत्त यांच्या नावे होता. मात्र, या पुरस्काराच्या नियमात अनेक बदल करण्यात आले असून हे दोन पुरस्कार श्रेणीतून हटवण्यात आले आहेत. याचे कारण अद्याप समजलेलं नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसाठी ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२२ च्या नियमांमध्ये बदल केले आहेत. यामध्ये दादासाहेब फाळके पुरस्कारासहित अनेक पुरस्कारांचा समावेश आहे. या बदलांमध्ये पुरस्कारांची रक्कम वाढवण्यात आली आहे. तर श्रेणींमध्ये बदल करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, समितीने कोरोना महारोगराईदरम्यान झालेल्या बदलांवर चर्चा केली. हे बदल करण्याचा निर्णय सर्वांच्या सहमतीने घेण्यात आला. मात्र नावं का वगळण्यात आली याच कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

२०२२ च्या राष्ट्रीय पुरस्कारांसाठी प्रवेशिका ३० जानेवारी रोजी बंद करण्यात आल्या आहेत. महारोगराईमुळे पुरस्कार मिळण्यास एक वर्ष उशीर होत असून २०२१ चे राष्ट्रीय पुरस्कार २०२३ मध्ये दिले जात आहेत.

समितीने सुचविलेल्या आणि नियमांमध्ये केलेल्या बदलांनुसार,
दिग्दर्शकाच्या सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपटासाठी इंदिरा गांधी पुरस्कार’चे नाव बदलून ‘सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट’ असे करण्यात आले आहे.
बक्षिसाची रक्कम आधी निर्माता आणि दिग्दर्शक यांच्यात विभागली जायची, पण आता ती फक्त दिग्दर्शकाकडे जाईल.

‘नॅशनल इंटिग्रेशनवरील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म’साठीचा ‘नर्गिस दत्त पुरस्कार’ आता ‘राष्ट्रीय, सामाजिक आणि पर्यावरणीय मूल्यांना प्रोत्साहन देणारा सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म’ म्हणून ओळखला जाईल. ही श्रेणी सामाजिक समस्या आणि पर्यावरण संरक्षणासाठी पुरस्कार विभाग देखील एकत्र करण्यात आली आहे.

पुरस्कारांच्या रकमेत वाढ

दादासाहेब फाळके पुरस्कारासाठीचे रोख पारितोषिक १० लाखांवरून १५ लाख रुपये करण्यात आले आहे, जे भारतीय चित्रपटसृष्टीतील चांगल्या योगदानाबद्दल भारतीय चित्रपट व्यक्तिमत्वाला दरवर्षी दिले जाते. याशिवाय विविध श्रेणीतील सुवर्ण कमळ पुरस्कारांची बक्षीस रक्कम ३ लाख रुपये आणि रौप्य कमळ विजेत्यांसाठी २ लाख रुपये करण्यात आली आहे. यापूर्वी वेगवेगळ्या श्रेणीनुसार बक्षिसाची रक्कम वेगवेगळी होती. सुवर्ण कमळ पुरस्कार सर्वोत्कृष्ट चित्रपट, पदार्पण चित्रपट, संपूर्ण मनोरंजन देणारा चित्रपट, दिग्दर्शन आणि बालचित्रपटाला दिले जाते. तर, रौप्य कमळ राष्ट्रीय, सामाजिक आणि पर्यावरणीय मूल्ये, सर्व अभिनय श्रेणी, सर्वोत्कृष्ट पटकथा, संगीत आणि इतर अशा श्रेणींतील विजेत्यांना दिले जाते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

अरबाज खानची पत्नी शुरा खानचे इंस्टाग्राम अकाउंट झालेले हॅक, सोशल मीडियावर दिली माहिती
घटस्फोटानंतरही किरण राव आमिरसोबत कम्फर्टेबल; म्हणाली, ‘आम्ही एकमेकांना चांगले समजतो’

हे देखील वाचा