तुम्ही हिंदी चित्रपटांचे चाहते असाल किंवा 90 च्या दशकातील चित्रपट पाहिले असतील तर तुम्ही ‘कुछ कुछ होता है’ पाहिला असेल. शाहरुख खान (Shahrukh Khan), काजोल (Kajol), राणी मुखर्जी ( Ranee Mukherjee) आणि सलमान खान (Salman Khan) असे दिग्गज कलाकार या चित्रपटात होते. त्यांच्या दमदार अभिनयापासून चित्रपटाची कथा, संवाद आणि गाण्यांपर्यंत सर्व काही आजही हिट आहे. दिग्दर्शक करण जोहरचा (karan Johar) हा पहिलाच चित्रपट होता. त्यामुळे त्याच्यासमोर अनेक आव्हानेही होती. त्याने शाहरुख आणि काजोलला मुख्य कलाकार म्हणून कास्ट केले होते, पण सहाय्यक भूमिकेसाठी कोणताही स्टार तयार होत नव्हता. मग ‘अमन’ या व्यक्तिरेखेसाठी सलमान खाननेच चित्रपटात एंट्री का आणि कशी घेतली? एका सिनवेळी करण सलमानसमोर गुडघे टेकून ढसाढसा रडला तेव्हा काय घडलं, या गाजलेल्या चित्रपटाशी संबंधित असे मजेशीर किस्से आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
या चित्रपटाबद्दल बोलताना करण जोहरने स्वतः मुलाखतीत सांगितले होते की, “या भूमिकेसाठी त्याने अनेक स्टार्सशी संपर्क साधला होता. शाहरुख खानसोबत चित्रपटात सहाय्यक भूमिका करण्याची त्यांची इच्छा नसल्याने ही भूमिका करण्यास कोणीही तयार झाले नाही. करण जोहरने याबद्दल बोलताना सांगितले होते की सलमान खान स्वतः माझ्याकडे येऊन चित्रपटात काम करणार असल्याचे बोलला होता.”
त्याचवेळी सलमान खानने एका मुलाखतीत सांगितले होते की, “करण जोहर माझी बहीण अलवीराला भेटला आणि म्हणाला की हा माझा पहिला चित्रपट आहे आणि मी काजोल आणि शाहरुख खानला साइन केले आहे. या चित्रपटात एक छोटी पण महत्त्वाची भूमिकाही आहे, ज्यासाठी मी स्टार शोधत आहे, पण तो मला सापडत नाहीये. मग माझ्या बहिणीने मला सांगितले की तो खूप चांगला माणूस आहे. हा त्याचा पहिला चित्रपट आहे आणि तुम्ही मदत करावी. त्यानंतर मी त्याला पार्टीमध्ये भेटलो आणि मी म्हणालो की मी हे माझ्या बहिणीसाठी, आणि शाहरुख खानसाठी करत आहे आणि अशा प्रकारे त्या चित्रपटाचा एक भाग बनलो.” करण जोहरच्या लेखनाने तोही प्रभावित झाल्याचे सलमानने सांगितले होते.
चित्रपटातील एका सीनचाही असाच एक मजेशीर किस्सा आहे. जेव्हा काजोल आणि सलमान लग्न करणार असतात. त्या दृश्यात करणला सलमानने सूट घालावा असे वाटत होते. पण फाटक्या जीन्स आणि टी-शर्ट घालण्याची त्याला सवय असल्याचे सलमानने सांगितले. आजपर्यंत असे कोणी पाहिले नाही आणि लोकांना त्याचा आनंद होईल, असे सलमान खानचे मत होते. सलमानचे हे ऐकून करण थक्क झाला. त्याला वाटलं कदाचित तो मस्करी करत असेल.
म्हणूनच तो सलमानला सांगतो की तुला सूट घालायला हवा, पण सलमान नकार देतो. या सीनमध्ये जीन्स-टी-शर्ट चालणार नाही, असे करण त्याला समजावत राहतो, पण तो ऐकत नाही. शेवटी दमलेला करण गुडघे टेकून रडायला लागतो आणि म्हणतो, असे करू नको हा माझा पहिला चित्रपट आहे. त्यानंतर सलमान त्यांना रडणे थांबवण्यास सांगतो आणि सूट घालण्यास होकार दिला. या सुपरहीट चित्रपटाबद्दल असे अनेक किस्से आजही सांगितले जातात.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा