Monday, June 17, 2024

‘माझं स्वतःच ऑफिस आहे आणि तो आजही…’, कंगणाने साधला ऋतिक रोशनवर थेट निशाणा

हिंदी सिने जगतात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या चित्रपटातील अभिनयापेक्षा त्यांच्या इतर वादांंमुळेच नेहमी चर्चेत असतात. यामध्ये अभिनेत्री कंगणा रणौतचे (Kangana Ranaut) नाव पहिल्यांदा घेतले जाते. कंगणा तिच्या वादांमुळे नेहमीच चर्चेत असते. कोणत्याही विषयावर आपले परखड आणि स्पष्ट मत ती व्यक्त करताना दिसते. तिच्या या विवादित वक्तव्यांमुळे अनेकदा तिला नेटकऱ्यांच्या टिकेलाही सामोरे जावे लागले आहे. कंगणा तिच्या कथित प्रेमप्रकरणांमुळेही चांगलीच चर्चेत आली होती. तिच्या आणि ह्रतिक रोशनच्या (Hritik Roshan) नात्यावर कंगणाने असेच अनेक गंभीर खुलासे केले होते. काय आहे हा किस्सा चला जाणून घेऊ. 

कंगना आणि हृतिकच्या अफेअरची सुरुवात ‘क्रिश’ चित्रपटापासून झाली होती. कंगनाच्या म्हणण्यानुसार, “हृतिकने तिला वचन दिले होते की तो त्याच्या पत्नीला घटस्फोट देईल आणि तिच्याशी लग्न करेल. मात्र, हृतिकने तिला फसवले आणि नंतर ब्रेकअप झाल्याचा दावा तिने केला. ब्रेकअपनंतर हृतिक आणि कंगना यांच्यातील भांडण माध्यमांमध्ये चांगलेच चर्चेत आली होती. कंगनाने तर म्हटलं होतं की, ‘मला आनंद आहे की मी आज मुंबईत माझं स्वतःचं घर आणि ऑफिस बनवलं आहे, तर माझा जुना प्रियकर आज भाड्याच्या घरात राहतो, ज्याचं भाडं त्याचे वडील देतात.” असं कंगनाने म्हटलं होतं.

एवढ्यावरच न थांबता कंगणाच्या म्हणण्यानुसार तिला इंडस्ट्रीमध्ये गोल्ड डिगर म्हणूनही संबोधले जात होते, तेही केवळ एका छोट्या शहरातून आल्याने तिच्यावर हा आरोप केला होता. कंगणा आपल्या पैशांच्या मागे लागल्याच्या हृतिकच्या आरोपावर कंगनानेही तिखट प्रतिक्रिया दिली. या आरोपांनंतरच तिने मुंबईत आलिशान घर आणि ऑफिस बांधले होते, जेणेकरून त्याला कळेल की ती त्याचा पैसा पाहून त्याच्या मागे लागले नाही असेही तिने सांगितले. दरम्यान अभिनेत्री कंगणाने अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले असून सध्या ती लॉकअप कार्यक्रम होस्ट करताना दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
ऋतिक रोशनमुळे गेला असता माझा जीव! ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’मधील ‘तो’ व्हिडिओ शेअर करत अभिनेत्याने केला खुलासा
‘चित्रा मेरी सासू’ म्हणणाऱ्या उर्फीला चित्रा वाघ यांचे जशास तसे उत्तर, म्हणाल्या….

हे देखील वाचा