Friday, July 5, 2024

नव्वदच्या दशकातील होती ‘ती’ प्रसिद्ध अभिनेत्री, मग रातोरात चित्रपटातून काढता पाय घेण्याचे कारण काय?

आज एका अशा अभिनेत्रीबद्दल बोलूया, जिच्या नावाची ८०-९०च्या दशकात खूप चर्चा झाली होती. आम्ही बोलतोय अभिनेत्री शिल्पा शिरोडकर (Shilpa Shirodkar) हिच्याबद्दल, जी तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत होती. पण चित्रपटसृष्टी सोडल्यानंतरही ती खूप चर्चेत आली. शिल्पा शिरोडकरचा जन्म २० नोव्हेंबर १९६९ रोजी झाला. शिल्पाच्या चित्रपट कारकिर्दीबद्दल सांगायचे तर, अभिनेत्रीने प्रसिद्ध चित्रपट निर्माते रमेश सिप्पी यांच्या १९८९ मध्ये आलेल्या ‘भ्रष्टाचार’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

शिल्पाने तिच्या लहान फिल्म करिअरमध्ये अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले होते. यामध्ये ‘गोपी किशन’, ‘बेवफा सनम’, ‘किशन कन्हैया’, ‘रघुवीर’ आणि ‘आँखे’ इत्यादींचा समावेश आहे. बातमीनुसार, शिल्पा शिरोडकरला खरी ओळख ‘किशन कन्हैया’ चित्रपटाच्या रिलीझनंतर मिळाली. या चित्रपटात शिल्पासोबत अनिल कपूर (Anil Kapoor) आणि माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) मुख्य भूमिकेत दिसले होते. (interesting facts about 90s bollywood actress shilpa shirodkar)

मात्र अचानक असे काय झाले, की शिल्पा शिरोडकरने तिच्या करिअरच्या शिखरावर असतानाही चित्रपटांना अलविदा केले. खरं तर, २००० साली शिल्पाने ब्रिटनमध्ये राहणारा एक मोठा बँकर अपरेश रंजीतसोबत लग्न केलं. असे म्हटले जाते की, लग्नानंतरही शिल्पाला कामाच्या अनेक ऑफर आल्या होत्या, पण तिने तिच्या कुटुंबाला वेळ देणे चांगले मानले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शिल्पा आज पूर्णपणे निरोगी आहे आणि भारतापासून दूर दुबईमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा