अशी झाली ‘महाराष्ट्र कन्या’ हैदराबादची सून, वाचा नम्रता शिरोडकर-महेश बाबूची सुंदर लव्हस्टोरी


नुकताच अभिनेत्री नम्रता शिरोडकरने तिचा ४९ वा वाढदिवस साजरा केला. नम्रताच जन्म २२ जानेवारी १९७२ मध्ये महाराष्ट्रात मराठी कुटुंबात झाला. नम्रतेची आजी मीनाक्षी शिरोडकर ह्या मराठी चित्रपटातील नावाजलेला चेहरा होत्या. त्यामुळे अभिनयाचे आणि या ग्लॅमर दुनियेशी तिचे जन्मांपासूनच नाते जोडले गेले. नम्रताची मोठी बहीण शिल्पा शिरोडकर ही बॉलिवूडमधील नावाजलेली आणि हिट अभिनेत्री. नम्रताने देखील तिच्या आजी आणि बहिणीच्या पावलावर पाऊल टाकत या क्षेत्रात येणायचे ठरवले होते.

नम्रताने १९९३ साली मिस इंडिया या सौंदर्यस्पर्धेत भाग घेत ती सौंर्दयस्पर्धा जिंकतं मिस इंडियाचा ताज डोक्यावर चढवला होता. त्यानंतर तिच्यासाठी बॉलिवूडचा दरवाजा खुला झाला.

नम्रताने सलमान खानच्या ‘जाब प्यार किसीसे होता हैं’ सिनेमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. भलेही या सिनेमात तिची भूमिका छोटी होती, तरी तिने याच छोट्या भूमिकेतून सर्वाना तिची दखल घ्यायला भाग पडले. त्यानंतर तिला खरी प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली ती महेश मांजरेकरांच्या ‘वास्तव’ मधून. या सिनेमाने तिला अनेक पुरस्कार देखील मिळून दिले.

त्यानंतर तिने दक्षिण भारतातील चित्रपटांमध्ये देखील अभिनय करायला सुरुवात केली. २००० साली ती तिच्या ‘वामसी’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान पहिल्यांदा अभिनेता महेश बाबू याला भेटली. त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. काही वर्षे एकेमेकांना डेट केल्यानंतर १० फेब्रुवारी २००५ मध्ये दोघे विवाहबद्ध झाले. महेश बाबू नम्रतापेक्षा वयाने तीन वर्षांनी लहान आहे. ऑगस्ट २००६ मध्ये या दोघांच्या पहिल्या मुलाचा गौतमचा जन्म झाला. त्यानंतर सहा वर्षांनी त्याच्या मुलीचा सिताराचा जन्म २० जुलै २०१२ रोजी झाला.

नम्रता पती आणि मुलांसोबत आता हैदराबादमध्ये स्थायिक झाली आहे. काही महिन्यांपूर्वी सिताराचा मराठीतील देवीची आरती म्हणतानाच विडिओ सोशल मीडियावर वायरल झाला होता.

नम्रताने काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत तिच्या आणि महेश बाबूच्या नात्याविषयीच्या सांगितले होते. आपल्या नात्याबद्दल बोलताना नम्रता म्हणाली होती, ‘महेशला वर्किंग वुमनशी लग्न करायचे नव्हते. त्यामुळे लग्नानंतर मी चित्रपटसृष्टीपासून लांब जाण्याचा निर्णय घेतला. करिअर मागे राहिल्याचे मला दुःख नाही. मी कधीच माझ्या आयुष्यात करिअरला मुख्य स्थान दिले नव्हते. म्हणजे मी माझे काम गांभीर्याने केले नाही असे नाही. पण मी कधी काम मागितले नाही आणि प्रसिद्धी आणि पैशांची मागणी सुद्धा केली नाही. माझ्याकडे जे आले ते मला मिळाले.”

आज महेश आणि नम्रता त्याच्या दोन्ही मुलांसोबत आनंदाने संसार करत आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.