नवज्योत सिंह सिद्धू हे नाव आपण क्रिकेट विश्वात, राजकीय पटलावर, टीव्हीवर खूप वेळा पाहिलं देखील आहे आणि ऐकलं देखील आहे. आधी क्रिकेटपटू, मग यशस्वी राजकारणी, मग पुन्हा क्रिकेट समालोचक आणि विनोदी रिऍलिटी शोजचं परीक्षण अशा सर्व क्षेत्रांमध्ये आपण त्यांना पाहिलं आहे. त्यांचा शायर अंदाज तर सर्वश्रुत आहेच परंतु त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी देखील ते प्रसिद्ध आहेत. अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचं वैवाहिक जीवन देखील काही कमी फिल्मी नाहीये. याच त्यांच्या प्रेम जीवनावर आपण एक नजर टाकणार आहोत.
नवज्योत सिंह सिद्धू यांच्या पत्नीचं नाव देखील नवज्योतच आहे हे आपल्याला माहीत असेलच परंतु क्रिकेटर नवज्योतच्या आयुष्यात डॉक्टर नवज्योतची एन्ट्री कशी झाली हे आपण पाहणार आहोत. नवज्योत सिंह सिद्धू यांनी नवज्योत कौर यांच्याशी प्रेमविवाह केला होता. परंतु हा होकार मिळवण्यासाठी सिद्धू यांची प्रचंड दमछाक झाली होती. नवज्योत कौर यांचा होकार मिळवण्यासाठी सिद्धू पाजी रोज ठराविक वेळी तासनतास नवज्योत यांच्या घराबाहेर त्यांची वाट पाहत असत.
काही दिवसांपूर्वी द कपिल शर्मा शो मध्ये मिस्टर अँड मिसेस सिद्धू हे पाहुणे म्हणून आले होते. त्यावेळी मिसेस सिद्धू यांनी ही गोष्ट त्या एमबीबीएस चा अभ्यास करत असतानाची आहे असे सांगितले. त्या म्हणाल्या की,”मी ज्या रस्त्याने कॉलेजला जायचे त्याच रस्त्याला सिद्धू तासनतास भर उन्हामध्ये माझी वाट पाहत उभे असायचे. मी दिसले की मग माझ्या मागोमाग चालू लागायचे आणि माझा होकार मिळवण्यासाठी मला मनवायचा प्रयत्न करायचे..” यावर आपल्या सिद्धू पाजींनी सुद्धा होकार मिसळला आणि सांगितलं की,”हिच्या घराबाहेर एक चिकन शॉप होतं. तिथे मी तासनतास हिची वाट पाहत राहायचो. हिला मी जेव्हा पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हाच माझ्या मनात हिला स्थान देऊन मोकळा झालो होतो.”
नवज्योत सिंह सिद्धू आणि नवज्योत कौर यांचं हे असं प्रेमप्रकरण खूप दिवस चालू होतं. अखेरीस एक दिवस नवज्योत कौर यांनी सिद्धू पाजींना होकार दिला. या दोघांच्या लग्नात फारच मोजक्या जणांना आमंत्रित करण्यात आलं होतं. सिद्धूपाजींच्या लग्नाची बातमी वर्तमानपत्रात छापून आल्यावर सर्वांना कळाली होती.
हेही वाचणं आहे महत्त्वाचं
–बॉलिवूड अभिनेत्रींचा अजब कारभार! विवाहित पुरुषांसोबत बांधली लगीन गाठ
–ब्रेकअप, घटस्फोट आणि पुन्हा लग्न, बॉलिवूडकरांची नात्यांची खिचडी
–बॉलिवूड अभिनेत्रींच्या हटके लव्ह स्टोरी, कमी वयाच्या नायकांसोबत बांधली लगीनगाठ
–कलाकार आणि त्यांच्या अजब सवयी; वाचून तुम्ही ही म्हणाल असं कुठं असतं का?