Tuesday, December 3, 2024
Home अन्य ‘हा राष्ट्रध्वजाचा अपमान’, अभिनेत्रीने क्रॉप टॉप घालून तिरंगा फडकावल्याने भडकले चाहते, शिकवला चांगलाच धडा

‘हा राष्ट्रध्वजाचा अपमान’, अभिनेत्रीने क्रॉप टॉप घालून तिरंगा फडकावल्याने भडकले चाहते, शिकवला चांगलाच धडा

छोट्या पडद्यावर झळकणारे कलाकार अनेकदा त्यांच्या कृतीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकतात. असेच काहीसे पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे. अभिनेत्री कंगना रणौत सूत्रसंचालन करत असलेल्या ‘लॉकअप’ या शोचा भाग राहिलेली अंजली अरोरा सध्या चांगलीच चर्चेत आहे. आधी तिचा एक एमएमएस समोर आला होता, ज्यामध्ये दिसत असलेली मुलगी अंजलीच असल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर अंजलीने सोशल मीडियावर याबाबत स्पष्टीकरण दिले होते की, व्हिडिओतील मुलगी ती नाहीये. अशात आता तिने एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामुळे तिला चांगलेच ट्रोल केले जात आहे.

रिव्हिलिंग आऊटफिटमध्ये फडकावला तिरंगा
अंजली अरोरा (Anjali Arora) हिच्या ताज्या व्हिडिओत दिसते की, ती स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने तिरंगा फडकावत आहे. मात्र, या व्हिडिओत अंजलीने परिधान केलेल्या आऊटफिटमुळे तिला जोरदार ट्रोल केले जात आहे. व्हिडिओत अंजली पांढऱ्या रंगाच्या क्रॉप टॉप आणि जीन्समध्ये दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

‘तिरंगा नाही, तर स्वत:लाच दाखवतेय’
हातात तिरंगा घेऊन फडकावणाऱ्या अंजलीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. मात्र, यासोबतच तिला नेटकरी चांगलेच ट्रोल करत आहेत. व्हिडिओच्या कमेंट्स सेक्शनमध्ये एका युजरने लिहिल आहे की, “तिरंगा नाही, तर स्वत:ला दाखवत आहे.” दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “हा भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान आहे.” आणखी एकाने लिहिले की, “हे तर दिखावा करण्यासारखेच झाले ना.”

कंगनाच्या शोमध्ये खळबळजनक खुलासे
कंगना रणौत (Kangana Ranaut) हिच्या ‘लॉकअप’ या शोचा भाग राहिलेल्या अंजलीने शोदरम्यान अनेक खळबळजनक खुलासे केले होते. शोमध्ये कंगनासोबत चर्चा करताना अंजली अनेकदा भावूक झाल्याचेही दिसले. मात्र, तिने या शोमध्ये मोठा प्रवास केला. असे करूनही तिला या शोची विजेती बनता आले नव्हते. या शोचे विजेतेपद मुनव्वर फारूकी याने पटकावले होते. वादामुळे हा शो चांगलाच चर्चेत राहिला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ बॉलिवूड कलाकारांच्या रक्तातच देशभक्ती! भारतीय सैन्याशी आहे घट्ट नातं
पाकिस्तानात जन्मूनही भारताचे नागरिकत्व घेणारा अदनान सामी, चार लग्नांमुळे आलेला चर्चेत
प्रजासत्ताक दिन: ‘या’ चित्रपटांमधील संवाद ऐकताच तुमच्या मनात जागृत होईल देशभक्तीची भावना; पाहा यादी

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा