Wednesday, July 2, 2025
Home अन्य सुनीता बेबीच्या ठुमक्यांनी दिली सपना चौधरीच्या डान्सला टक्कर, तिच्याच गाण्यावर मिळवले १० लाख हिट्स

सुनीता बेबीच्या ठुमक्यांनी दिली सपना चौधरीच्या डान्सला टक्कर, तिच्याच गाण्यावर मिळवले १० लाख हिट्स

‘हरियाणवी क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी डान्सर आणि अभिनेत्री सपना चौधरी हिला आता कोणत्याही परिचयाची गरज नाही. तिचे डान्स व्हिडिओ प्रदर्शित होताच तुफान व्हायरल होऊ लागतात. मात्र, सध्या आणखी एक नाव गाजतंय, जिच्या ठुमके आणि अदेची चांगलीच चर्चा रंगलीये. सपनाच्या व्हिडिओंप्रमाणे आणखी एका हरियाणवी डान्सरचा व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.

इंटरनेटवर लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळवणाऱ्या या व्हिडिओत दिसणारी डान्सर इतर कुणी नसून सुनीता बेबी (Sunita Baby) आहे. सुनीता सपना चौधरी (Sapna Choudhary) हिच्याप्रमाणेच धमाल डान्सने सर्वांचे लक्ष वेधत आहे. तिच्या व्हिडिओंनाही युट्यूबवर भरमसाठ व्ह्यूज मिळत आहेत. सपना चौधरीनंतर आता चाहत्यांना सुनीता बेबीच्या अवतारात एक नवीन डान्सर मिळाली आहे. अलीकडेच, सुनीताचा एक डान्स परफॉर्मन्स व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती सपना चौधरीच्या ‘गोली चल जावेगी’ (Goli Chal Javegi) या गाण्यावर जबरदस्त परफॉर्म करताना दिसत आहे.

सुनीता बेबीच्या डान्सची (Sunita Baby Dance) अनोखी स्टाईल पाहून चाहते खूप खुश झाले आहेत आणि नाचत आहेत. सुनीता बेबीचा हा व्हिडिओ ‘देसी हरियाणवी’ (Desi Haryanvi) नावाच्या चॅनलने २०१८ साली युट्यूबवर अपलोड केला होता. या व्हिडिओला आतापर्यंत ११ लाख ६६ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. सुनीताच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरून लावता येऊ शकतो की, तिचे प्रत्येक डान्स व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सुनीता तिच्या डान्सने सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असते. सुनीताने एक डान्सर म्हणून तिची एक खास ओळख निर्माण केली आहे. मागील काही वर्षांमध्ये तिने हरियाणामध्ये तिला चांगली ओळख मिळाली आहे.

युट्यूबवर सुनीता बेबीचे अनेक व्हिडिओ आहेत, ज्यात तिने दमदार डान्स केला आहे. तिचे हे डान्स व्हिडिओ तिच्या चाहत्यांना पुन्हा पुन्हा बघायला आवडतात. सपनाच्या स्टाईलप्रमाणे डान्स करून सुनीता चाहत्यांची वाहवा लुटण्याची एकही संधी सोडत नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

ऑडिशनमध्ये रिजेक्ट झाला राघव अन् पडली मिथुनदांची नजर, पुढं जाऊन बनला ‘स्लो मोशन किंग’

सचिन पिळगावकरांची लेक ‘या’ वेबसीरिजमध्ये बनणार ‘सेक्स वर्कर’, भुवन बामही लावणार अभिनयाचा तडका

साठ रुपयापासून करिअरला सुरुवात केलेले अलोकनाथ ‘असे’ बनले संस्कारी बापू, वाचा

हे देखील वाचा