Sunday, October 1, 2023

ऑडिशनमध्ये रिजेक्ट झाला राघव अन् पडली मिथुनदांची नजर, पुढं जाऊन बनला ‘स्लो मोशन किंग’

डान्सर, कोरिओग्राफर, टीव्ही होस्ट आणि अभिनेता अशा विविध भूमिका लीलया पार पाडणारे कलाकार खूप कमी असतात. सर्वांच्याच वाट्याला अशा संधी येत नाहीत. मात्र, ज्यांच्या वाट्याला येते, ते त्याचं सोनं केल्याशिवाय राहत नाहीत. अशाच प्रकारे संधीचं सोनं करणारा अभिनेता आहे राघव जुयाल. राघवला ‘स्लो मोशन किंग’ म्हणूनही ओळखले जाते. त्याने भारतात ‘स्लो मोशन वॉक’ पुन्हा जिवंत केले आहे. हाच राघव साेमवारी (दि. 10 जुलै) त्याचा 32वा वाढदिवस साजरा करत आहे. राघवच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याच्या आयुष्यातील खास गोष्टींबाबत.

राघव जुयाल (Raghav Juyal) याचा जन्म 10 जुलै, 1991 रोजी डेहराडून येथे झाला होता. राघवचे वडील दीपिक जुयाल हे एक वकील आहेत. त्याच्या आईचे नाव बख्शी जुयाल असे आहे. त्याची आई पंजाबी, तर वडील गढवाली आहेत. राघवने कधीही डान्सची ट्रेनिंग घेतली नाहीये. मात्र, अनेकांना प्रश्न पडेल की, मग तो डान्स कसा शिकला? तर राघव इंटरनेट आणि टीव्हीवर पाहून डान्स शिकला आहे. तो शालेय जीवनात डान्स स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा आणि सतत जिंकायचा.

राघवने डान्सिंग रियॅलिटी शो ‘डान्स इंडिया डान्स 3’मधून अफाट प्रसिद्धी मिळवली आहे. मात्र, तुम्हाला माहितीये का, तो यापूर्वी या शोचा भाग बनण्यापूर्वी ऑडिशनमध्ये रिजेक्ट झाला होता? तो फक्त आणि फक्त दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांच्यामुळे या शोमध्ये आला. पुढे तो शोचा स्पर्धक बनला आणि त्याच्या दमदार डान्स परफॉर्मन्सने आणि स्लो मोशन स्टाईलने फिनालेपर्यंत मजल मारली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Raghav Juyal (@raghavjuyal)

खरं तर, राघव याने शोमध्ये येण्यापूर्वी कधीही कोणत्याही प्रोफेशनल डान्सरकडून डान्सचे धडे घेतले नव्हते. तसेच, त्याने प्रोफेशनल डान्सर म्हणून डान्स केला नव्हता. सन 2012मध्ये जेव्हा ‘डान्स इंडिया डान्स 3’चे ऑडिशन सुरू होते, तेव्हा त्यानेही ऑडिशन दिले आणि तो अव्वल 18 स्पर्धकांच्या यादीत सामील होऊ शकला नाही. म्हणजेच त्याला ऑडिशनमध्ये रिजेक्ट केले गेले.

मिथुन चक्रवर्ती यांच्या निर्णयाने बदलले नशीब
मात्र, पुढे राघवचा ऑडिशनदरम्यान केलेल्या परफॉर्मन्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर आगीप्रमाणे पसरला. राघव रिजेक्ट झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला शोमध्ये स्पर्धक म्हणून सामील करण्याची मागणी लावून धरली. प्रेक्षकांच्या मागणीच्या जोरावर शोचे ‘ग्रँड मास्टर’ राहिलेले मिथुन चक्रवर्ती यांनी एक खास निर्णय घेतला आणि राघवला वाईल्ड कार्ड राऊंडमध्ये आपले ट्रंप कार्ड बनवून एंट्री दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Raghav Juyal (@raghavjuyal)

उपविजेता बनला होता राघव
राघवनेही मिथुन यांच्या निर्णयावर स्वत:ला सिद्ध केले. त्याने आपल्या वेगवेगळ्या डान्स परफॉर्मन्सने प्रेक्षकांची मने जिंकली आणि फिनालेपर्यंत मजली मारली. तो या सिझनमधील सर्वात प्रसिद्ध स्पर्धकही बनला. तो शेवटपर्यंत पोहोचला, पण विजय मिळवू शकला नाही. तो उपविजेता ठरला. मात्र, त्याने विजेत्या स्पर्धकापेक्षाही जास्त प्रसिद्धी मिळवली. यानंतर त्याने कधीही मागे वळू पाहिलेच नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Raghav Juyal (@raghavjuyal)

राघव जुयालने काम केलेल सिनेमे
डान्सिंग आणि कोरिओग्राफीसोबत राघवने अभिनयातही आपला हात आजमावला आहे. त्याने सन २०१४मध्ये आलेल्या ‘सोनाली केबल’मधून अभिनयात पदार्पण केले होते. या सिनेमात अली फजल आणि रिया चक्रवर्ती मुख्य भूमिकेत होते. दुसरीकडे राघव सहाय्यक भूमिकेत होता. यानंतर राघव ‘एबीसीडी 2’, ‘नवाबजादे’, ‘स्ट्रीट डान्सर’, ‘बहुत हुआ सन्मान’ यांसारख्या सिनेमात काम केले आहे.(happy birthday raghav juyal life change actor mithun chakraborty decision)

अधिक वाचा-
श्वेता तिवारीच्या काळ्या साडीतील घायाळ करणाऱ्या अदा, फोटो पाहून चाहते फिदा
“नाव ‘बाईपण भारी देवा’ असलं तरी…”, अभिनेते संजय मोने यांची ‘ती’ पोस्ट चर्चेत

हे देखील वाचा