सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ नेहमीच व्हायरल होत असतात. लॉकडाऊन दरम्यान अनेक कलाकार त्यांचे मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. अशातच इंटरनेट स्टार रिकी पाँड हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. त्याचे मजेशीर व्हिडिओ नेहमीच व्हायरल होत असतात. त्याचे व्हिडिओ बघून सगळ्यांचेच घर बसल्या मनोरंजन होत असतो. त्याने याआधी देखील अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. या व्हिडिओमध्ये प्रामुख्याने डान्स करताना दिसत असतो. रिकी पाँड हा एक परदेशी व्यक्ती आहे. तो बॉलिवूडमधील अनेक गाण्यांवर व्हिडिओ बनवत असतो. अशातच रिकीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
रिकी पाँडने नुकताच त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे. यात तो व्हिडिओमध्ये ‘मस्त चाललंय आमचं’ या मराठी गाण्यावर डान्स स्टेप्स करताना दिसत आहे. या गाण्यावर तो अगदी मराठी अंदाजात डान्स करत आहे.
नेहमीप्रमाणेच त्याचा हा डान्स व्हिडिओ त्याच्या चाहत्यांना खूप आवडत आहे. त्याचे चाहते या व्हिडिओवर कमेंट करून त्याच्या डान्सचे कौतुक करत आहेत.
रिकी हा बॉलिवूड कलाकारांप्रमाणेच सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. त्याचे सोशल मीडियावर लाखोंमध्ये फॉलोवर्स आहेत. त्याचा कोणताही व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल होत असतो. त्याचे हे सातत्याने व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्याच्या फॅन फॉलोविंगमध्ये खूप वाढ झाली आहे. एक विदेशी व्यक्ती असूनही त्याला बॉलिवूड गाण्यांबद्दल खूप प्रेम आहे. तो अनेक गाण्यांवर व्हिडिओ करून त्याच्या चाहत्यांसाठी शेअर करत असतो.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…