‘कुठं मेलास, घरी कधी येणार?’ सुगंधा मिश्राने पतीला असा प्रश्न विचारताच, सासूने टाकला तिच्यावर रागाचा कटाक्ष!

see why comedian sugandha mishra s mother in law gets angry on her


कॉमेडियन सुगंधा मिश्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. या माध्यमातून ती सतत काही ना काही पोस्ट करून चाहत्यांचे मनोरंजन करण्याची एकही संधी सोडत नाही. तिचे मजेदार व्हिडिओ नेहमी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सुगंधाने शेअर केलेला असाच एक मजेदार व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

सुगंधा मिश्राने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती फोनवर काहीतरी बोलताना दिसत आहे. तसेच या व्हिडिओमध्ये तिची सासू आणि संकेत भोसलेची आई सुवर्णा भोसले देखील पाहायला मिळाल्या आहेत. सुगंधा फोनवर असे काहीतरी बोलते, ज्यामुळे तिची सासू तिच्याकडे रागाने बघू लागते.

सुगंधाने यात एका डायलॉगवर अभिनय केला असून, असे दाखवले आहे की, ती पतीसोबत बोलत आहे. फोनवर बोलताना सुगंधा अगोदर म्हणते की, “कुठं मेला आहेस तू. कधीपर्यंत घरी येशील.” तेवढ्यात तिची सासू तिच्यावर एक कटाक्ष टाकते. हे पाहताच सुगंधा व्यवस्थित बोलू लागते आणि म्हणते, “कुठे आहात तुम्ही, कधीपर्यंत येणार. आई देखील विचारत आहेत.” हा व्हिडिओ शेअर करत, सुगंधाने लिहिले की, “जेव्हा तुम्ही तुमच्या बेस्टफ्रेंडशी लग्न करता.” हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच पसंत केला आहे.

सुगंधा मिश्राबद्दल बोलायचे झाले, तर ती २६ एप्रिल रोजी कॉमेडियन आणि डॉ. संकेत भोसलेसोबत लग्नबंधनात अडकली आहे. तिची टीव्हीवर दीर्घ कारकीर्द राहिली आहे. २००८ मध्ये ती ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ मध्ये दिसली होती, ज्याने तिला बरीच ओळख मिळवून दिली. नंतर ती ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये विद्यावती (शिक्षक) च्या भूमिकेत दिसली, ज्यामुळे ती खूप प्रसिद्ध झाली. काही दिवसांपूर्वीपासून सुगंधा तिच्या लग्नाबद्दल खूप चर्चेत आहे. तिचे लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

 

 


Leave A Reply

Your email address will not be published.