जगभरातील क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागून राहिलेला इंडियन प्रिमिअर लीग म्हणजेच आयपीएलचा अंतिम सामना रविवार २८ मे रोजी नरेंद्र मोदी स्टेडिअम अहमदाबादमध्ये पार पडत आहे. या सामन्यासाठी भव्यदिव्य तयारी करण्यात आली असून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हजेरी लावणार आहेत. सामन्याआधी झालेल्या आयपीएलच्या समारोह समारंभात बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावत तुफान परफॉमन्स दिले. ज्याचे व्हिडिओ चांगलेच व्हायरल होत आहेत. या कार्यक्रमात ए. आर रेहमानच्या ‘वंदे मातरम’ गाण्याने सर्वांनाच ठेका धरायला भाग पडले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
आयपीएलमधील सर्वात महत्वाचा अंतिम सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स या दोन संघामध्ये खेळला जात आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जात असून खच्चाखच्च स्टेडियम भरलेले पाहायला मिळत आहे. या सामन्याआधी झालेल्या कार्यक्रमात नरेंद्र मोदी स्टेडियमवर बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगच्या धमाकेदार डान्स परफॉमन्सने सर्वांनाच नाचायला लावले. रणवीर सिंंगचा हा धमाकेदार डान्स पाहताना स्टेडियममधील प्रेक्षकांनीही त्याच्यासोबत ठेका धरलेला पाहायला मिळाला.
Vande Mataram ???????? @arrahman's magical performance will touch your hearts. #TATAIPL | #GTvRR pic.twitter.com/ixvjn9vlRT
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2022
रणवीरसिंंगच्या डान्ससोबतच गायक ए. आर रेहमानच्या जादूई आवाजाने आणि गाण्यांनी वातावरणात आणखीणच रंगत आणली. ए. आर रेहमानने वंदे मातरम गाण्याने सर्वांच्याच अंगावर काटा उभे राहिले. या गाण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ए. आर रेहमानच्या जय हो गाण्यावरही अनेकांनी ताल धरलेला पाहायला मिळाला. ए. आर रेहमान, रणवीर सिंगसोबतच स्टेडियममध्ये अक्षय कुमार,आमीर खाननेही स्टेडियमवर हजेरी लावली होती.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा