Sunday, June 4, 2023

‘आमच्या नात्यात कधीच वय अडसर ठरले नाही’, परमीतसोबतच्या नात्यावर अर्चनाने केले भाष्य

लवकरच टेलिव्हिजन इंडस्ट्रीवरचा सर्वात गाजणार कॉमेडी शो कपिल शर्मा शो ब्रेक घेणार आहे. असे असले तरी अर्चना पूर्ण सिंग टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये सक्रिय राहणारच आहे. ती एका नवीन शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या नवीन शोचे नाव आहे ‘इंडियाज लाफ्टर चॅम्पियन’. हा शो कपिल शर्माच्या शोला रिप्लेस करणार आहे. अर्चनाने तिच्या करिअरमध्ये विविध प्रकारच्या जवळपास सर्वच भूमिका साकारल्या असे असले तरी तिचे जोराने हसणे ही तिची एक वेगळी आणि मोठी ओळख बनली. अर्चना तिच्या व्यावसायिक आयुष्यात खूपच यशस्वी झाली. सोबतच तिचे वैयक्तिक आयुष्य देखील खूपच गाजले.

नुकतेच एका मुलाखतीदरम्यान तिने तिच्या आणि तिचा नवरा असलेल्या परमीत सेठीच्या नात्यावर भाष्य केले. तिने सांगितले की, “टीव्हीवर तुम्ही मला दुसऱ्यांच्या विनोदावर हसताना पाहतात, मात्र घरी मी जोकर असते आणि माझा नवरा, मुलं माझ्या विनोदांवर आनंदाने खळखळून हसतात. अर्चना प्रमाणे परमीतने देखील अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले असून, एका चित्रपटाचे दिग्दर्शन देखील केले आहे. आम्ही नेहमीच या गोष्टीवरून हसतो की, आमच्यात पतीपेक्षा पत्नीचे करिअर अधिक हिट आहे.”

पुढे अर्चना म्हणते, “मला आनंद वाटतो की, परमीत माझ्या आयुष्यात आला. तो खूपच समजुदार आणि मच्योर समंजस व्यक्ती आहे. त्याने नेहमीच मला साथ दिली. भलेही त्याच्या करिअरची सुरुवात हळू झाली असली तरी त्याने अनेक उत्तम चित्रपट, मालिका आणि वेबशोमध्ये काम केले. एक चांगला अभिनेता असण्यासोबतच तो एक उत्तम लेखक आणि दिग्दर्शक देखील आहे. त्याने नेहमीच त्याच्या कामातून स्वतःला सिद्ध केले आहे.”

अर्चना आणि परमीत यांच्यामध्ये सात वर्षांचे अंतर असून अर्चना परमीतपेक्षा सात वर्षांनी मोठी आहे. या दोघांनी ३० वर्ष झाले त्यांचे लग्न टिकवले असून, आजही ते एक उत्तम कपल म्हणून ओळखले जातात. यावर अर्चना म्हणते, “१९९२ साली आम्ही लग्न केले त्याआधी आम्ही दोघे चार वर्ष रिलेशनशिपमध्ये होतो. आम्ही अनेकदा आमच्यात असणाऱ्या वयाच्या अंतरावर चर्चा केली, मात्र आम्हाला कधीच असे वाटले नाही की केवळ वयातील अंतरामुळे आम्ही एकमेकांची साथ गमवावी. मात्र आमच्या दोघांच्याही कुटुंबाला यावर आपत्ती होती. माझ्या परिवाराने मला यावर अनेकवेळा विचार देखील करायला लावला. माझ्या मनात यावर कधीच काहीच शंका नव्हता. आज आमच्या लग्नाच्या तीस वर्षानंतर आणि दोन मुलानंतर आम्ही आमचे नाते टिकवले आहे.”

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा