Thursday, October 16, 2025
Home मराठी युक्रेनची इरिना शिकतेय मराठी! बिग बॉस सदस्य करत आहेत कौतुक

युक्रेनची इरिना शिकतेय मराठी! बिग बॉस सदस्य करत आहेत कौतुक

बिग बॉस मराठीचा नवीन सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या नव्या सिझन मध्ये नवनवीन चेहरे दिसत आहेत. अनेक किस्से घडत असल्याने हा शो प्रेक्षांचे चांगले मनोरंजन करत आहे. बिग बॉस मराठी मध्ये फॉरेनर स्पर्धक देखील सहभागी झाली आहे.

युक्रेनची असलेली इरिना रुडाकोवा सध्या नवीन भाषा शिकते आहे. हि भाषा शिकताना तिची उडणारी त्रेधातीरपिट बघण्याजोगी आहे. इरिना घरात मराठी शिकत आहे. एका नवीन प्रोमो मध्ये अंकिता इरीनाला भाषा शिकवताना दिसते आहे. अंकिता इरिनाला म्हणते, मका नको सांगू! मग इरिना म्हणते राम कृष्ण हरी.वैभव चव्हाणला ती विचारते कि, ‘तुम्ही कसे आहात’ त्यावर वैभव चव्हाण तिला म्हणतो एकदम मस्त !

आजच्या भागात सुरज चव्हाण इरीनाला डान्स करायला शिकवतो आणि त्यानंतर इरिना सुद्धा सुरज सारखाच डान्स करते हे बघायला मिळणार आहे. इरिना सुरजला बकरी म्हणते. प्रत्युत्तरात सुरज तिला ‘मी शेर आहे’ असे म्हणतो. मग त्यावर इरिना त्याला ‘मी कोब्रा आहे’ असं म्हणते. हि सगळी मजा मस्ती बिग बॉसच्या घरात बघायला मिळणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

बिग बॉससाठी रीतेश घेतोय इतके मानधन ! आकडा ऐकून चकित व्हाल
बिग बॉस OTT 3 चा फायनलिस्ट साई केतन राव विषयी या गोष्टी माहिती आहेत का ? राज्यस्तरीय बॉक्सर होता अभिनेता

 

 

हे देखील वाचा