Thursday, September 19, 2024
Home मराठी परदेसी गर्लचा प्रवास संपला; इरिनाने बिग बॉसच्या घरातून घेतला निरोप

परदेसी गर्लचा प्रवास संपला; इरिनाने बिग बॉसच्या घरातून घेतला निरोप

बिग बॉस मराठीचा चौथ्या आठवड्याचे एलिमिनेशन नुकतंच पार पडलं. या आठवड्यात इरिना रुडाकोवा घराबाहेर पडली. या आठवड्यात अभिजीत सावंत, आर्या जाधव, वैभव चव्हाण व इरीना घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी थेट नॉमिनेट होते. त्यातील परदेसी गर्लचा बिग बॉस चा प्रवास संपला.

इरिनाची बिग बॉसच्या घरात ग्लॅमरस इंट्री दिसून आली. घरात आल्यानंतर घरातील इतर सदस्यांनी तिला मराठी शिकवण्याचा प्रयत्न केला. तसेच तिला आपल्यात रुळवून घेतलेले दिसून आले. परंतु तिच्या या चार आठवड्यांच्या बिग बॉसच्या प्रवासात ती कुठेही ठळकपणे दिसली नाही.

बिग बॉसच्या घरात वैभव आणि तिची चांगली केमिस्ट्री दिसून आली. लोकांना त्यांचा बॉण्ड चांगलाच पसंतीस पडताना दिसून येत होता. मात्र , घरातील कार्य व घरामध्ये तिचा विशेष सहभाग दिसला नाही. तसेच मागच्या आठवड्यात तिचे निक्की बरोबर झालेल्या भांडणात ती चर्चेत आली. परंतु स्वतःचे मत ठामपणे न मांडणे या गोष्टीमुळेच तिला घराबाहेर पडावे लागल्याचे सांगण्यात येत आहे.

परदेसी गर्ल नेमकी आहे कोण ?
बिग बॉसच्या घरात सामील झालेली इरीना ही आयपीएलमध्ये मॉडेल व चिअर गर्ल म्हणून कार्यरत आहे. मुळची परदेशी असलेली इरिना अनेक वर्षांपासून मुंबईत स्थायिक आहे. तिच्या मराठी भाषा व संस्कृती जपण्याची धडपड पाहून भाऊचा धक्क्यावर रितेश देशमुखने सुद्धा तिचे कौतुक केले. आता इरिनाच्या जाण्याने समीकरणे कसे बदलतात हे पाहणे नक्कीच महत्त्वाचे असणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा – 

दीपिका कक्करने कायमचा सोडला अभिनय? आई झाल्यानंतर करतीये हे काम
‘प्रेम हा त्याग आहे आणि…’ नागा चैतन्यच्या एंगेजमेंटनंतर समंथा प्रभूच्या भावनांचा फुटला बांध

author avatar
Shruti Pathak

हे देखील वाचा