कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीचा पाचवा सीजन सध्या चांगलाच चर्चेत दिसतोय. बिग बॉसच्या चौथा आठवड्याचा भाऊचा धक्का नुकताच पार पडला. शनिवारच्या भागात रितेश देशमुख ने टीम एला चांगलेच फैलावर घेतलेले दिसून आले. संपूर्ण आठवडाभर जान्हवीने घरात चांगलाच कल्ला केलेला दिसून आला. जान्हवीने पॅडी कांबळे यांना ओव्हरॲक्टिंग करतात म्हणून हिणवले. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राभरातून जान्हवी वर टीका करण्यात आली. या सगळ्याचा परिणाम म्हणूनच रितेश देशमुखने जान्हवीला चांगलेच खडेबोल सुनावले. आणि तिला जेलमध्ये टाकले. तसेच निक्की आणि अरबाजची सुद्धा रितेश देशमुख यांनी शाळा घेतली.
अशातच रविवारच्या भागात तिला चक्रव्यूह खोलीत पाठवण्यात आले. तिथे तिच्याच टीमने तिच्याबद्दल बोललेल्या चुगल्या तिला दाखवण्यात आल्या. त्यामुळे निक्की चांगलीच चिडलेली दिसून आली. त्यानंतर खोलीच्या बाहेर येऊन तिने अरबाज , जान्हवी व वैभव यांना उद्देशून असे म्हटले की , “टीम एच्या कोणालाही मी ट्रॉफी उचलू देणार नाही अशी मी इथे शपथ घेते. टीम बीमधील लोकांनी जरी ट्रॉफी उचलली तरी मी एक वेळ खुश होईल पण मी ए टीमच्या लोकांच्या हातात ट्रॉफी पडू देणार नाही”.
निक्कीला दाखवण्यात आलेल्या चुगल्यांचा टीम एवर काय परिणाम होतो. हे पाहणे नक्कीच मनोरंजक असणार आहे. तसेच या आठवड्यात घराबाहेर जाण्याचा प्रक्रियेसाठी अभिजीत सावंत, आर्या जाधव इरिना रुकडोवा व वैभव चव्हाण नॉमिनेट झाले होते. यातील परदेशी गर्ल इरिना हीच बिग बॉसमधील प्रवास संपला आहे आणि तिने हा घरचा काल निरोप घेतलेला आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –
दीपिका कक्करने कायमचा सोडला अभिनय? आई झाल्यानंतर करतीये हे काम
‘प्रेम हा त्याग आहे आणि…’ नागा चैतन्यच्या एंगेजमेंटनंतर समंथा प्रभूच्या भावनांचा फुटला बांध