Friday, July 5, 2024

इतर अभिनेत्यांच्या तोंडून वडील इरफान खानचे कौतुक ऐकून ढसाढसा रडला बाबिल; कलाकारांचेही पाणावले डोळे, पाहा भावुक व्हिडिओ

दिवंगत अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबिलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये बाबिल त्याच्या वडिलांची आठवण करून खूप भावूक होताना दिसत आहे. वास्तविक, हा व्हिडिओ फिल्मफेअर पुरस्कार 2021 दरम्यानचा आहे. यावेळी इरफान खानला विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. अभिनेत्याच्या वतीने त्याचा मुलगा बाबिल पुरस्कार स्वीकारण्यासाठी पोहोचला होता. यावेळी, तो भावुक होऊन खूप रडू लागला. बाबिलच्या या व्हिडिओवर जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत.

बाबिलचा हा व्हिडिओ कलर्सने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, राजकुमार राव, रितेश देशमुख आणि आयुष्मान खुराना कशाप्रकारे दिवंगत अभिनेता इरफान खानचे कौतुक करत आहेत. आपल्या वडिलांचे कौतुक ऐकून प्रेक्षकांमध्ये बसलेला बाबिल खूप भावूक झाला आणि तो रडलाही. नंतर बाबिल स्टेजवर जातो आणि त्याच्या वडिलांचा सन्मान स्वीकार करतो.

बाबिल यावेळी असेही म्हणाला की, मेहनत करून तो अभिमानाने आपल्या वडिलांचे नाव चमकवेल. त्याचे असे बोलणे ऐकून प्रत्येकजण टाळ्या वाजवू लागतो. चाहत्यांसह कलाकारही बाबिलच्या या व्हिडिओवर जोरदार प्रतिक्रिया देत आहेत.

याव्यतिरिक्त बाबिल सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो आणि त्याच्या पोस्टही जोरदार व्हायरल होत असतात. तसेच, तो सध्या लंडनमध्ये चित्रपट आणि अभिनयाचा अभ्यास करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-लहान मुलांना बर्गर वाटून तरुणाने जिंकली सर्वांची मने, ‘बारिश की जाए’ गाण्यावरही लावले ठुमके; गायक बी प्राककडून व्हिडिओ शेअर

-‘ब्रोकन बट ब्युटीफुल!’ सिद्धार्थ शुक्लाच्या किसिंग सीनला चाहत्यांची पसंती; मात्र शहनाजचे चाहते झाले निराश

-‘मी परफेक्ट नाहीये’, लूकबद्दल प्रश्न उपस्थित केल्यानंतर अनुष्काने दिले होते प्रत्युत्तर

हे देखील वाचा