Tuesday, July 9, 2024

नेटफ्लिक्सच्या ‘काला’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार इरफान खानचा मुलगा; म्हणाला, ‘बाबांच्या ….’

दिवंगत अभिनेता इरफान खानचा मोठा मुलगा बाबिल खान (Babil Khan)’काला’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. अन्विता दत्त दिग्दर्शित या चित्रपटात तृप्ती डिमरी, स्वस्तिका मुखर्जी आणि अमित सियाल यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. नेटफ्लिक्स रिलीजसाठी सज्ज,एका कार्यक्रमात या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. चित्रपटाविषयी पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधताना बाबिलने स्क्रिप्ट वाचण्यापूर्वीच या प्रकल्पात सहभागी होण्यास उत्सुक असल्याचे उघड केले. वडिलांच्या निधनानंतर तो तुटला परंतु टीमने त्याला ऐकटेपण वाटू दिले नाही, असेही त्याने सांगितले.

तो म्हणाला, “माझा एक जवळचा मित्र अन्विताचा सहाय्यक आहे आणि मी स्क्रिप्ट वाचण्यापूर्वी मला चित्रपट करायचा होता. मला त्याबद्दल दुसरा विचार कधीच आला नव्हता आणि मी ऑडिशनसाठी तयार होतो. हा तो काळ होता जेव्हा बाबांचे निधन झाले आणि मी पूर्ण तुटलो होतो. जेव्हा मी क्लीन स्लेट फिल्म्समध्ये पोहोचलो तेव्हा मला खूप सुरक्षित वाटले.

 

View this post on Instagram

 

 अन्विताने बाबिलच्या कामाचे कौतुक केले आणि सांगितले की तो सेटवर खूप ऊर्जा घेऊन आला होता. दिग्दर्शकाने असेही सांगितले की बाबिलची ऑन-स्क्रीन उपस्थिती उत्तम आहे आणि तो चित्रपटात फक्त “सुंदर, निरागस आणि अविश्वसनीय” होता. ती म्हणाली, “बाबिलला कदाचित आठवत नसेल पण मी त्याला एका पार्टीत भेटले होते जेव्हा तो फक्त 14 वर्षांचा होता. आम्ही जगनसाठी ऑडिशन घेत होतो तेव्हा आम्ही अनेक मुलांची चाचणी घेतली. काहीतरी खूप चांगले होते परंतु कोणी योग्य फिट होत नव्हते. त्याने ज्या मित्राचा उल्लेख केला त्याने सहज विचारले की, मला बाबिलची चाचणी करायची आहे. तो अभिनयात आहे हे मला माहीत नव्हते. मला माहित होते की तो चित्रपटांचा अभ्यास करत आहे आणि त्याला सिनेमॅटोग्राफर बनायचे आहे. जेव्हा मी ऑडिशन पाहिलं तेव्हा फक्त दोन ओळीत मला कळलं की तो जगन आहे. ही पहिलीच वेळ होती जेव्हा तो कॅमेऱ्याला सामोरे जात होता आणि ते भयानक असू शकते. बाबिल देखील एका उदास ठिकाणाहून येत होता आणि तरीही त्याची उर्जा टिकवून ठेवली होती. तो खरोखरच एक चांगला मुलगा आहे आणि चित्रपटात चमकला आहे.”

काला हा चित्रपट 1930 च्या सुरुवातीच्या काळात सेट झाला आहे आणि संगीतकारांच्या जीवनावर लक्ष केंद्रित करेल. अन्विता दत्त म्हणाल्या की, नेटफ्लिक्स चित्रपटात पालकत्व या विषयावर आणि त्याचा एखाद्या व्यक्तीवर कसा परिणाम होतो यावरही चर्चा केली जाईल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
बापरे! ‘किंग खान’ला वाटते ‘या’ गोष्टीची भिती; नाकारली ‘डॉन 3’ची ऑफर
जेव्हा नशेत टल्ली होऊन शाहरुखच्या घरी पोहचला होता कपिल शर्मा, पुढचा राडा तुम्हीच वाचा
‘या’ अभिनेत्रीने केली आत्महत्या, कुटुंब आणि मित्रासाठी लिहली खास नोट

हे देखील वाचा