Sunday, July 14, 2024

बापरे! ‘किंग खान’ला वाटते ‘या’ गोष्टीची भिती; नाकारली ‘डॉन 3’ची ऑफर

शाहरुख खान (Shah Rukh Khan)’जवान’ आणि ‘पठाण’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. त्याने अलीकडेच ‘रॉकेटरी’ आणि ‘लाल सिंग चड्ढा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये कॅमिओ केला आहे. आता चाहत्यांना त्याला ‘डॉन 3’मध्ये पाहायचे आहे. मात्र शाहरुखने सध्यातरी या चित्रपटात काम करण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे. नुकताच त्याला या चित्रपटाची ऑफर आली होती. या चित्रपटाची पटकथा फरहान अख्तरने लिहिली आहे. शाहरुख या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर पूर्णत: समाधानी नसल्यामुळे त्याने आता चित्रपट करण्यास नकार दिल्याचे बोलले जात आहे.

शाहरुख खानला ‘डॉन 3’ची स्क्रिप्ट देण्यात आली होती आणि त्याने ती नाकारली होती. सूत्रानुसार, “असे नाही की शाहरुख खानला स्क्रिप्ट आवडली नाही, एवढेच की शाहरुखला पूर्णपणे खात्री नव्हती. त्याला माहित आहे की डॉन हे एक महत्त्वाचे पात्र आहे.” आणि एकदा शाहरुखला स्क्रिप्टबद्दल पूर्ण खात्री झाली की, तो पुन्हा या भूमिकेत येऊ इच्छितो. बॉक्स ऑफिसची परिस्थिती अजून चांगली चाललेली नाहीये. कोणत्याही प्रोजेक्टवर सही करण्यापूर्वी त्याला अनेक वेळा विचार करावासा वाटतो. सध्या फरहान अख्तर पुन्हा स्क्रिप्टवर काम करत आहे.

पुढीलवेळी जेव्हा तो शाहरुखला भेटेल तेव्हा सुपरस्टार आनंदाने डॉन 3 साइन करेल अशी अपेक्षा करू शकतो. यामुळे त्याच्या चाहत्यांना खूप आनंद होईल. जेव्हा चित्रपटाच्या अनुमानांनी इतकी क्रेझ निर्माण केली, तेव्हा कल्पना करा की ज्या दिवशी चित्रपट निर्माते डॉन 3 ची घोषणा करतील त्या दिवशी काय होईल!”

शाहरुख खानचा आगामी चित्रपट
शाहरुखचे तीन चित्रपट प्रेक्षकांना भेटला येणार आहे. तो ‘पठाण’ चित्रपटातून पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटात तो एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्याही भूमिका आहेत. त्याचवेळी तो राजकुमार हिरानीच्या ‘डंकी’ आणि अ‍ॅटलीच्या ‘जवान’मध्ये दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
जेव्हा नशेत टल्ली होऊन शाहरुखच्या घरी पोहचला होता कपिल शर्मा, पुढचा राडा तुम्हीच वाचा
‘या’ अभिनेत्रीने केली आत्महत्या, कुटुंब आणि मित्रासाठी लिहली खास नोट
ब्रेकिंग! बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्याला विमानतळावरच अटक

हे देखील वाचा