Thursday, June 12, 2025
Home कॅलेंडर नशेत धुंद आर्यन खानने विमानतळावरच केली लघूशंका? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओतील सत्य

नशेत धुंद आर्यन खानने विमानतळावरच केली लघूशंका? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओतील सत्य

कधी कधी अशा काही घटना घडतात, ज्यांचे व्हिडिओ काही मिनिटांतच सोशल मीडियावर व्हायरल होतात. अनेक वेळा या व्हायरल व्हिडिओंमुळे सेलिब्रिटींची प्रतिमा खराब होण्याची भीती असते. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगा विमानतळावर लघवी करताना दिसत आहे. या व्हायरल पोस्टमध्ये असा दावा केला जात आहे की, हा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) आहे. जाणून घेऊया काय आहे या व्हायरल व्हिडिओचे सत्य…

या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या मुलाने डेनिम जीन्ससोबत क्रीम कलरचा फुल स्लीव्ह टी-शर्ट घातला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, विमानतळाच्या ग्राउंड स्टाफमधील एक व्यक्ती त्याला काहीतरी म्हणतो आणि त्याचा हात धरतो. त्यानंतर तो व्यक्ती हात सोडतो आणि तो मुलगा चालायला लागतो. त्याचे चालणे पाहून, तो मुलगा नशेत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. (is shahrukh khan son aryan khan urinating in public at airport know the reality of viral video)

अचानक करू लागला लघवी
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तो मुलगा अचानक त्याची पॅंट उघडतो आणि विमानतळावरच लघवी करायला लागतो. जे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटते. हे करत असताना ग्राउंड स्टाफमधील एक व्यक्ती त्याला थांबवतो.

जोडलं जातंय आर्यन खानचं नाव
खरं तर, व्हिडिओमधील मुलाचे हावभाव, हेअरस्टाइल आणि ड्रेसिंग हुबेहुब शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सारखी दिसत आहे. त्यामुळे लोक त्याला आर्यन खान मानत आहेत. पण हे सत्य नाही.

व्हायरल व्हिडिओमागील सत्य
हा व्हिडिओ जवळपास ९ वर्षे जुना आहे. या व्हिडिओमध्ये दिसणार्‍या व्यक्तीचे नाव ब्रॉन्सन पेलेटियर (Bronson Pelletier) आहे, ज्याने २००९-१२मध्ये ‘द ट्विलाइट सागा’ सीरिजच्या ४ चित्रपटांमध्ये काम केले आहे. डिसेंबर २०१२ च्या या घटनेचा उल्लेख ब्रॉन्सन पेलेटियरच्या विकिपीडियामध्येही केला आहे. या घटनेनंतर त्याला २ वर्षांसाठी प्रोबेशनमध्येही पाठवण्यात आले होते. म्हणजेच, व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती आर्यन खान नसून अभिनेता ब्रॉन्सन पेलेटियर असल्याचे सिद्ध होते.

हेही वाचा :

हे देखील वाचा