गेल्या काही दिवसांपासून भाजप नेता चित्रा वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यामध्ये सोशल मीडियार वॉर होताना आपण पाहिलाच आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या कपड्यांवर टीका करत तिच्या विरोधात तक्रारही नोंदवली आहे. मात्र, उर्फीने देखिल त्यांना सडेतोड उत्तरे दिली आहेत. अशातच पुन्हा अएकदा चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावर ट्वीट शेअर करत थेट महिला आयोगालाच प्रश्न केला आहे.
‘बिग बॉस ओटीटी‘ फेम उर्फी जावेद (Urfi Javed) सतत आपल्या आगळ्या वेगळ्या फॅशेनमुळे चर्चेत असते. एवढेच काय तर तिचे कपडे हे अंगप्रदर्शन करणारे असतात. उर्फीच्या अशा कपड्यावरुन आणि पब्लीक प्लेसमध्ये अर्धनग्न अवस्थेत फिरण्यावर चित्रा वाघ यांनी आक्षेप केला आहे. त्यामुळे त्यांनी 3 दिवसांपूर्वी ट्वीटरवर एक व्हिडिओ शेअर केला होता. यांनतर उर्फीने देखिल त्यांच्या ट्वीटला प्रतिउत्तर दिले होते. मात्र, आता चित्रा वाघ यांनी थेट महिला आयोगाला या प्रकरणामध्ये लक्ष देण्याची मागणी केली आहे. त्याशिवाय महिला आयोग या प्रकरणात शांत का? असा प्रश्न देखिल त्यांनी उपस्थित केला आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांचा वाद शिगेला पोहोचला आहे. त्याशिवया दोघीही सोशल मीडियाद्वारे आक्रमक भूमिका घेत एकमेकींवर टीका करत आहेत अशात चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा व्हिडिओ शेअर करत उर्फी जावेदच्या उघडंनागडं फिरण्याला महिला आयोगाचं समर्थन आहे का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
चित्रा वाघ यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरुन व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या की, “महिला आयोगाची फक्त भाषा नको आहे तर कृती हवी आहे. भर रस्त्यात, सार्वजनिक ठिकाणी उघडंनागडं फिरणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का? उर्फी जावेद अत्यंत बीभत्सपणे रस्त्यावर फिरते आहे. महिला आयोगाने याचा जाब का विचारला नाही? माझा विरोध उर्फी या व्यक्तीला नाही. तर तिच्या उघड्यानागड्या, घाणेरड्या, ओंगळवाण्या आणि किळसवाण्या विकृतीला आहे. ज्या पद्धतीने महिला आयोगाने भूमिका मांडली त्याचा अर्थ असं उघडंनागडं फिरण्याला महिला आयोगाचं समर्थन आहे का? कायदा कायद्याचं काम करणारच आहे. आमचं शिंदे फडणवीसांचं सरकार महाराष्ट्रात आहे. सरकार सरकारचं काम करणार आहेच. मात्र महिला आयोगाला याबाबत काही वाटतं आहे की नाही? अशा पद्धतीचा नंगानाच हा महाराष्ट्रात आम्ही खपवून घेणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. उघडंनागडं सार्वजनिक ठिकाणी फिरणं ही आमची संस्कृती नाही.”
भाषा नको तर कृती हवी..
सार्वजनिक ठिकाणी उघडंनागडं फिरणं हि आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे का ?
मुंबईतल्या भर रस्त्यात उर्फीच्या या शरीरप्रदर्शनाचं जे अतिशय बिभत्स आहे @Maha_MahilaAyog समर्थन करतंय का ?
आणि हो …कायदा कायद्याचं काम करणारंच महिला आयोग काही करणार की नाही ? pic.twitter.com/O0KSb9A5r7
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 4, 2023
काही दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांनी ट्वीटच्या माध्यमाद्वारे म्हणाल्या होत्या की, “मला ही कुठे दिसली तर तिचं थोबाड रंगवेन.” अशा वक्तव्यानंतर महिला आयोगाने या प्रकरणात लक्ष घातलं आणि आध्यक्ष रुपाली चाकणकर म्हणाल्या की, “चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदचं थोबाड रंगवण्याची भाषा केली आहे. त्यांनी जो इशारा दिला आहे त्यावरून उर्फीच्या जिवालाही धोका असू शकतो. त्यामुळे तिच्या सुरक्षेविषयी काही तक्रारी असतील तर त्या तक्रारींची राज्य महिला आयोग दखल घेईल.” महिला आयोगाच्या अशा वक्तव्यानंतर चित्रा वाघ माहिला आयोगाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत. महिला आयोगाला उर्फी जावेदचं उघडं फिरणं दिसत नाही का? महिला आयोगाचं उर्फीच्या अशा वागण्याला समर्थन आहे का ? असा प्रश्न आता चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
“…काय दिसता ओ तुम्ही” प्रसाद ओकचा ‘तो’ फनी व्हिडिओ झाला तुफान व्हायरल
‘…मी स्वप्नांवर विश्वास ठेवायला शिकलो’, प्रथमेश परबने दिल्या ‘टाईमपास’ सिनेमाच्या आठवणींना उजाळा