Sunday, April 14, 2024

“…काय दिसता ओ तुम्ही” प्रसाद ओकचा ‘तो’ फनी व्हिडिओ झाला तुफान व्हायरल

प्रसाद ओक मराठी सिनेसृष्टीतील एक बहुआयामी व्यक्तिमत्व. प्रसादने आजवर अनेक मालिकांमध्ये , चित्रपटांमध्ये आणि नाटकांमध्ये काम केले आहे. आता तो अभिनयासोबतच दिग्दर्शन देखील उत्तम पद्धतीने करत आहे. प्रसाद नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या संपर्कात असतो. सोशल मीडियावर सक्रिय असणारा प्रसाद नेहमीच त्याच्या नवनवीन प्रोजेक्ट्सची माहिती देत असतो. नुकतीच त्याने त्याच्या आगामी सिनेमाची घोषणा देखील केली आहे. मात्र सध्या त्याच्या या सिनेमाच्या चर्चेसोबतच त्याचा एक खास व्हिडिओ देखील चांगलाच व्हायरल होत आहे.

या मजेशीर व्हिडिओमध्ये प्रसाद म्हणतो, “काल मला एक सुंदर मुलगी भेटायला आली आणि म्हणाली, काय दिसता ओ तुम्ही”, तोच व्हिडिओमध्ये मागून एक आवाज येतो “वयाच्या मानाने”. हा आवाज नक्कीच प्रसादच्या बायकोचा मंजिरीचा आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना प्रसादने कॅप्शनमध्ये लिहिले, “वयाच्या मानाने वगैरे असं काही नसतंच. या सगळ्या अंधश्रद्धा असतात”. त्याचा हा मजेशीर व्हिडिओ आता चांगलाच गाजत आहे. त्याच्या या व्हिडिओवर इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांच्या अतिशय मजेशीर कमेंट्स येत आहेत.

 

प्रसादच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर तो सध्या सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमध्ये परीक्षक म्हणून दिसत आहे. याशिवाय तो सध्या काही चित्रपटांवर देखील काम करत आहे. मागच्यावर्षी प्रसादचा शिवसेना नेते आनंद दिघे यांच्यावर आधारित ‘धर्मवीर’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने संपूर्ण महाराष्ट्रात बक्कळ कमाई केली. आता लवकरच या सिनेमाचा दुसरा भाग येणार आहे. याशिवाय नुकतीच प्रसादने त्याच्या आगामी सिनेमाची घोषणा केली असून, त्याचा हा सिनेमा जेष्ठ नाट्यनिर्माते प्रभाकर पणशीकर यांच्यावर आधारित असणार आहे.(prasad oak shared video goes viral)

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘पठाणमधून पगार आला नाही का?’, दीपिकाला इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करताना पाहून युजरची कमेंट, Video

अंगावर फक्त बेडशीट अन् हातात कॉफी, ‘बिग बॉस 16’ फेम प्रियांकाचा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल

हे देखील वाचा