Saturday, January 17, 2026
Home टेलिव्हिजन बिग ब्रेकिंग! लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्रीचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन, दोन दिवसांपूर्वी झाला होता वाढदिवस

बिग ब्रेकिंग! लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्रीचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन, दोन दिवसांपूर्वी झाला होता वाढदिवस

हिंदी टेलिव्हिजन जगतातून एक धक्कादायक बातमी सध्या समोर येत असून ‘इश्कबाज’ आणि ‘कुबूल है’ सारख्या लोकप्रिय शोची अभिनेत्री निशी सिंग भाडली (Nishi Singh Bhadli) यांचे निधन झाले आहे अभिनेत्री गेल्या चार वर्षांपासून आजारी होती. तर गेल्या दोन वर्षांत त्यांना दोनदा पॅरालिसिसचा झटका आला. निशी सिंग भाडली अवघ्या ४८ वर्षांची होती. दोनच दिवसांपूर्वी 16 सप्टेंबरला अभिनेत्रीचा वाढदिवसही होता. निशी सिंह भादली यांनी ‘तेनाली रामा’ या मालिकेतही काम केले होते. त्यांची आर्थिक परिस्थितीही अतिशय बिकट होती. दोन वर्षांपूर्वी तिच्या पतीने आजारपणाचा खर्च भागवण्यासाठी लोकांची मदतही मागितली होती.

मृत्यूची पुष्टी करताना तिचे पती संजय सिंह भादली म्हणाले, ‘निशी चार वर्षांपासून आजारी होती. 13 फेब्रुवारी 2019 रोजी त्यांना अर्धांगवायूचा पहिला झटका आला. यानंतर 3 फेब्रुवारी 2022 रोजी दुसरा झटका आला. त्यानंतर 24 मे 2022 रोजी त्यांना तिसऱ्यांदा अर्धांगवायूचा झटका आला. तेव्हापासून ती रुग्णालयात दाखल होती. त्यानंतर 2 सप्टेंबर रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. सगळं खूप छान चाललं होतं. मात्र काल, शनिवारी सायंकाळी उशिरा तिची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर रात्री एक वाजण्याच्या सुमारास आम्ही तिला कूपर रुग्णालयात नेले. तिला यापूर्वीही तेथे दाखल करण्यात आले होते. रविवारी दुपारी ३ वाजता तिने अखेरचा श्वास घेतला. संजय सिंह भाडली यांनी पुढे सांगितले की, या अभिनेत्रीवर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कोणती स्मशानभूमी जाणार हे आम्ही अजून ठरवलेले नाही.

अभिनेत्री शारीरिक त्रासातून जात होती. यासोबतच तिला आर्थिक समस्यांनीही घेरले होते. काही वर्षांपूर्वी तिचे पती आणि अभिनेता आणि लेखक संजय सिंभादली यांनीही निशी सिंगच्या उपचारासाठी मदतीची याचना केली होती. जेव्हा निशी सिंगला अर्धांगवायूचा झटका आला तेव्हा त्या या त्रासातून सावरत होत्या की त्यानंतर तिला पुन्हा अर्धांगवायूचा झटका आला. या सर्व प्रकारानंतर त्यांची प्रकृती वाईट होत गेली.

हेही वाचा –अबब! सहा महिने, 500 पेक्षा जास्त कर्मचारी आणि रात्रंदिवस काम, असा तयार होतो ‘बिग बॉस’चा सेट
अनुष्काने पतीच्या आठवणीत लिहिली भावूक पोस्ट, विराटनेही दिला असा रिप्लाय की, सर्वत्र रंगली एकच चर्चा
‘तारक मेहता’च्या दिग्दर्शकांनी कार्यक्रम सोडणाऱ्या कलाकारांबद्दल केला मोठा खुलासा; म्हणाले,’हे काही…’

हे देखील वाचा