‘तारक मेहता’च्या दिग्दर्शकांनी कार्यक्रम सोडणाऱ्या कलाकारांबद्दल केला मोठा खुलासा; म्हणाले,’हे काही…’

0
57
asit kumar
photo courtesy:Instagram/asitkumarrmodiofficial

तारक मेहता का उल्टा चष्मा (Tarak Mehta ka ooltah chashmah) या टीव्ही शोचे सर्वांनाच वेड लागले आहे. या शोने 14 वर्षे पूर्ण केली असून आता 15व्या वर्षात प्रवेश केला आहे. एकापाठोपाठ एक अनेक कलाकार सध्या हा शो सोडत आहेत. अशा परिस्थितीत स्टार्सने शो सोडल्याने चाहतेही खूप दुःखी आहेत. मालिकेतील महत्त्वाचे पात्र असणाऱ्या तारक मेहता अर्थात अभिनेते शैलेश लोढा (Shailesh Lodha) यांनी ही मालिका सोडली होती. यानंतर आता शैलेश लोढांच्या जागी अभिनेता सचिन श्रॉफ(Sachin Shroff) याची वर्णी लागली आहे.

पण चाहत्यांना त्याचा अभिनय अजिबात आवडला नाही. त्याचबरोबर स्टार्स शो सोडण्यामागे अनेक कारणे समोर आली आहेत. आता शोचे निर्माते असित मोदी यांनी या सगळ्यावर खुलेपणाने आपले मत मांडले आहे. असित मोदी म्हणाले की, ‘गेल्या 13-14 वर्षांपासून आम्ही लोकांचे मनोरंजन करत आहोत. आम्ही नवीन कथा आणि कल्पनांवर काम करत आहोत. जेव्हा कोणी शो सोडतो तेव्हा मला खूप वाईट वाटते कारण माझ्यासाठी संपूर्ण टीम एका कुटुंबासारखी आहे. इतक्या दिवसात आम्हाला एकमेकांची सवय झाली आहे. असित मोदी पुढे म्हणतात की, लोकांनी शो सोडावा असे मला वाटत नाही.

शोचे निर्माते पुढे म्हणाले, प्रत्येकाच्या स्वतःच्या गरजा असतात, त्यामुळे मी कोणाला दोष देत नाही. कधीकधी मी त्यांच्या गरजा पूर्ण करू शकत नाही, कारण जीवनात बदल आवश्यक आहे. त्यामुळे हा बदल आपण सकारात्मक पद्धतीने घ्यावा आणि निरोप घेणाऱ्यांना प्रेम आणि आशीर्वाद द्यावेत.

काही दिवसांपूर्वी बातम्या येत होत्या की काही स्टार्स शो सोडत आहेत कारण त्यांचे शोच्या निर्मात्यांसोबत मतभेद आहेत. आता शैलेश लोढा त्यांचे कवी संमेलन घेऊन येत असल्याच्या बातम्याही येत आहेत. यामुळेच शोच्या निर्मात्यांना निवेदन देण्यासाठी पुढे यावे लागले.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
‘आता वेळ आलीये…’, चंदिगड विद्यापीठातील व्हायरल एमएमएसवर सोनू सूदचा संताप

बोल्ड अँड ब्युटीफूल! जान्हवीचे लेटेस्ट फोटो तुम्हालाही करतील घायाळ
अनिल कपूर यांना यामुळे वाटायची जॅकी श्रॉफची भीती, स्वतः केला खुलासा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here