Saturday, July 6, 2024

मृत्यूच्या तब्बल चार वर्षांनी ओम पुरी पुन्हा एकदा झळकणार रुपेरी पडद्यावर… ‘हा’ नवा सिनेमा येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

दिवंगत अभिनेते ओम पुरी हे बॉलिवूडमधील मानाचं पान. ओम पुरी यांना जाऊन आता जवळपास चार वर्षे झाली. २०१७ साली आलेला सलमान खान स्टारर आणि कबीर खान दिग्दर्शित ‘ट्युबलाईट’ हा सिनेमा ओम पुरी यांचा अखेरचा चित्रपट ठरला. परंतु पुरी सरांच्या फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. ट्युबलाईट नंतर ओम पुरी यांच्या अभिनयाची झलक पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना पाहायला मिळणार आहे. १८ डिसेंबर ला ‘ओमप्रकाश झिंदाबाद’ हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. या सिनेमातील महत्त्वाच्या भूमिकेत आपल्याला ओम पुरी याना पाहता येणार आहे.

दिवंगत अभिनेते ओम पुरी यांच्यासोबत केलेला आपला चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असल्याबद्दल अभिनेता इश्तियाक खान यांना अत्यानंद झाला आहे. इश्तियाक सांगतात की ओम पुरी चित्रपटाच्या प्रीमियर साठी आज आपल्यात नसले तरी महान अभिनेते आणि त्यांच अभिनय कौशल्य कधीच मरत नाहीत. ‘ओमप्रकाश झिंदाबाद’ नावाचा हा चित्रपट १८ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

इश्तियाक खान म्हणाले की, ‘हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याबद्दल मला खरोखर आनंद झाला आहे. आमची मेहनत आणि हा महत्त्वाचा विषय प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे याबद्दल मी कृतज्ञ आहे. हा सिनेमा अतिशय नाजूक विषयाशी संबंधित आहे.

इश्तियाक म्हणाले, ‘मला उत्तम अभिनेता ओम पुरीसोबत काम करण्याची संधी मिळाली याचा आनंद आहे. त्यांचा आवाज अविस्मरणीय आहे. या चित्रपटाशी संबंधित बर्‍याच आठवणी आहेत. कलाकार आणि त्याचे अभिनय कौशल्य कधीच मरत नाहीत. ते नेहमीच प्रेक्षकांच्या बरोबर असतात. ओम पुरी सर असेच एक महान अभिनेते होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन रणजित गुप्ता यांनी केलं आहे.

हे देखील वाचा