आपल्या महाराष्ट्रात साधुसंतांना त्याचप्रमाणे देवदेवतांना खूप महत्त्व आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक सणाला एक महत्त्व आहे. अशातच साडे तीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर एक नवीन प्रकल्प समोर आला आहे. तो म्हणजे डिजी रॉयस्टर प्रोडक्शन आणि आनंदमूर्ती फिल्म देशाला भक्ति प्रेम प्रदान करणारी तसेच समतेची आणि बंधुतेची पेरणी करून माणूसपण ढवळून काढणारी संत चरित्रमाला ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ही सिरीज घेऊन येत आहे. या ईश्वरनिष्ठांची मांदियाळी या सिरीजमध्ये आपल्याला महात्मा बसवेश्वरांपासून ते संत नरसी मेहतांपर्यंत संत ज्ञानेश्वरापासून ते फकीर लालोन शहापर्यंत संपूर्ण संतांची चरित्रमाला पाहायला मिळणार आहे.
ही सिरीज महाराष्ट्रातील प्रेक्षक वर्गासाठी ही एक मेजवानी असणार आहे. या सिरीजचे दिग्दर्शक योगीराज सूर्यकांत भिसे हे आहेत. त्याचप्रमाणे चिन्मय रेमाणे, शरद बोदगे, योगीराज भिसे आणि शिवतेज होडगे हे या सिरीजचे निर्माते आहेत. त्याचप्रमाणे स्वामीराज सूर्यकांत भिसे हे या सिरीजचे लेखक आहेत. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ही सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
महेश मांजरेकर ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा नवाकोरा सिनेमा प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत
अजित कुमारने अभिनयापासून रेसिंगपर्यंत मिळवली प्रसिद्धी; जाणून घ्या त्याचा करिअर प्रवास