‘कौन बनेगा करोडपती’? अतिशय लोकप्रिय असलेल्या या शो मध्ये सहा लाख चाळीस हजार रुपयांसाठी स्पर्धकाला एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्या प्रश्नाच्या चार पर्यायांमध्ये स्पर्धकाने सनी लियोन हा पर्याय निवडला आणि त्या स्पर्धकाने सहा लाख चाळीस हजार हजार रुपये गमावले.
‘कौन बनेगा करोडपती’? हा टेलिव्हिजन वरचा प्रश्नमंजुषेचा सर्वात लोकप्रिय शो आहे. २००० सालापासून सुरु झालेल्या या शो ने प्रसिद्धीचे अनेक शिखर गाठले किंबहुना अजूनही गाठत आहे. अमिताभ बच्चन यांच्या सूत्रसंचलनामुळे शो ला नेहमीच चार चाँद लागतात.
सहभाग घेतलेल्या स्पर्धकांचे नशीब बदलणारा हा शो टीव्ही वर पाहताना जरी सोपा वाटत असला तरी प्रत्यक्षात मात्र असे नाहीये. अनेकवेळा आपल्याला गोंधळात टाकणारे प्रश्न किंवा पर्याय आपल्यासमोर येतात. असेच काहीसे एका स्पर्धकांबाबतीत घडले.
के.बी.सी.च्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका भागात रचना त्रिवेदी या हॉटसीटवर बसल्या होत्या. त्यांना सहा लाख चाळीस हजार रुपयांसाठी नितु कपूर यांच्याशी संबंधित प्रश्न विचारण्यात आला. तो प्रश्न होता,
प्रश्न : यापैकी कोणत्या अभिनेत्रींचे खरे नाव हरनीत कौर आहे?
१) सनी लियोन
२) नितु कपूर
३) बबिता
४) पूनम ढिल्लन
रचना यांनी या प्रश्नाच्या उत्तरासाठी पर्याय एकची निवड केली. सनी लियोन हे उत्तर दिले आणि दुर्दैवाने त्यांचे उत्तर चुकले. या प्रश्नाचे योग्य उत्तर होते पर्याय २ नितु कपूर. रचना यांच्याकडे तीन लाईफलाईन देखील शिल्लक होत्या. मात्र गोंधळून त्यांनी सनी लियोन उत्तर दिले. उत्तर चुकल्यामुळे त्यांना तीन लाख वीस हजार रुपयांवरच समाधान मानावे लागले. रचना त्रिवेदी या गुजरात मधील राजकोटच्या रहिवासी असून, सध्या त्या जर्मनी मध्ये जॉब करत आहे. फिरण्याची आवड असलेल्या रचना यांनी आतापर्यंत १२ देशांना भेटी दिल्या आहेत.