हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते असलेल्या विनोद भानुशाली यांच्याबद्दल एक बातमी समोर येत आहे. भानुशाली यांच्या घरी इनकम टॅक्स विभागाची छापेमारी चालू आहे. यासोबतच बॉलिवूडमधील अजून अनेक लहान मोठ्या प्रोडक्षसन हाऊसवर देखील या विभागाची नजर असल्याचे समजत आहे. इनकम टॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सिहित्रपट निर्माता जयंतीलाल गढ़ा यांच्या परिसरावर देखील ही छापेमारी चालू आहे.
Mumbai: Income tax raids underway at offices of producer Vinod Bhanushali, other production houses
Read @ANI Story | https://t.co/3numsKhEcX#Mumbai #IncomeTax #VinodBhanushali pic.twitter.com/GK8LMEStJC
— ANI Digital (@ani_digital) April 19, 2023
विनोद भानुशाली यांची कंपनी आधी देशातील एका मोठ्या शीर्ष संगीत आणि प्रोडक्शन कंपनीसोबत जोडली गेली होती. त्यांनी आता नुकतेच काही दिवसांपूर्वी त्यांचे स्वतःचे एक प्रोडक्शन हाऊस चालू केले आहे. मिळणाऱ्या माहितीवरून इनकम टॅक्स विभागाच्या लोकांनी विनोद यांच्या ‘भानुशाली स्टूडियोज लिमिटेड’, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) मध्ये असलेल्या हिट्स म्यूजिक आणि भानुशाली गृह कार्यालयामध्ये शोध घेतला आहे.
यासोबतच ‘पेन स्टुडिओ’ ही प्रोडक्शन कंपनीचे प्रमोटर असलेल्या जयंतीलाल गढा यांच्या ऑफिसमध्ये आणि घरी देखील इनकम टॅक्सच्या लोकांनी छापेमारी केली आहे. जयंती लाल यांच्या स्टुडिओ आणि घरी अजूनही इनकम टॅक्सच्या अधिकाऱ्यांचे सर्च ऑपरेशन सुरु आहे. यासोबतच अजून तीन प्रोडक्शन हाऊसचे देखील सर्च ऑपरेशन सुरु आहे. सांगितले जात आहे की, आर्थिक अनियमितता आणि टॅक्स चोरीमुळे इनकम टॅक्स विभागाचे हे ऑपेरेशन सुरु आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
निधनापूर्वी सतीश कौशिक करत होते ‘या’ सुपरहिट सिनेमाच्या सिक्वलची तयारी सलमान खानने केला खुलासा
इरफान खान यांचा शेवटचा सिनेमा असलेल्या ‘द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियंस’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित