दिवंगत अभिनेता इरफान खान यांच्या शेवटच्या सिनेमाचा ‘द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा हिंदीमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन’ हा सिनेमा येत्या २८ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. २९ एप्रिल रोजी इरफान खान यांना निधन होऊन तीन वर्ष पूर्ण होत आहे. अनुप सिंग यांचे दिग्दर्शन असलेल्या द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन’ हा सिनेमा २०१७ साली ७० व्या लोकोर्ना फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवला गेला होता.
दरम्यान बाबीलने देखील त्याच्या वडिलांच्या ‘द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन’ या सिनेमाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. त्याने हा सिनेमाचा हिंदी ट्रेलर प्रदर्शित झाल्याचे देखील सांगितले आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांना खूपच आवडत असून, त्यांनी या ट्रेलर चांगला प्रतिसाद दिला आहे.
‘द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियंस’ सिनेमात इरफान खानसोबत ईरानी अभिनेत्री गोलशिफ्तेह फरहानी मुख्य भूमिकेत आहे. तर जेष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान देखील सिनेमात दिसणार आहे.
सिनेमाची कथा राजस्थानच्या जैसलमेरमध्ये घडत असल्याचे दाखवले गेले आहे. हा सिनेमा एका आस्थेवर आधारित आहे. विंचूने डंख मारल्यानंतर व्यक्तीचा २४ तासाच्या आत मृत्यू होतो असे दाखवण्यात आले आहे. मात्र त्या व्यक्तीचा विंचवाच्या गाण्यापासून वाचवले जाऊ शकते. मुख्य भूमिका साकारणारी गोलशिफतेह विंचु गायिका आहे तर इरफान हा उंटांचा व्यापारी दाखवण्यात आला आहे. दरम्यान २९ एप्रिल २०२० साली इरफान खान यांचे कॅन्सरमुळे निधन झाले. इरफान बॉलिवूडमधील प्रतिभावान अभिनेता म्हणून ओळखला जायचा.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रेट्रो मूड ऑन करणारे ‘फकाट’मधील “तुझी माझी जोडी” प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला
सलमान खान का घालताे फाटलेले बूट? ‘या’ कलाकारांनी केला धक्कादायक खुलासा, वाचा संपुर्ण प्रकरण