शाहिद कपूर आणि करीना कपूर यांचा तुफान गाजलेला सिनेमा म्हणजे ‘जब वी मेट’. बॉलिवूडमधील तुफान गाजलेला सिनेमा, लोकप्रिय जोडी, हिट सिनेमा म्हणून जब वी मेट चित्रपट ओळखला जातो. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई तर केली सोबतच खूप लोकप्रियता देखील मिळवली. सर्वात रोमॅंटिक आणि कॉमेडी सिनेमा म्हणून आजही जब वी मेट सिनेमाचे नाव आधी घेतले जाते. इम्तियाज अली दिग्दर्शित २००७ साली आलेल्या या सिनेमाने आजही तब्बल १६ वर्षांनी देखील प्रेक्षकांच्या मनावर छाप कोरून ठेवली आहे. यावर्षी व्हॅलेंटाइन डे च्या निमित्ताने पुन्हा एकदा काही जुन्या गाजलेल्या रोमॅंटिक सिनेमांना पुन्हा एकदा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केले गेले. त्यात शाहिद आणि करीनाचा जब वी मेटचा देखील समावेश होता.
View this post on Instagram
जब वी मेट सिनेमा बघण्यासाठी १६ वर्षांनी देखील चित्रपटगृहांमध्ये तोबा गर्दी होती. असेच एका शोच्या दरम्यान शाहिद कपूरने स्वतः चित्रपटगृहांमध्ये जाऊन प्रेक्षकांची भेट घेतली. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. जेव्हा शाहिद कपूरने चित्रपटगृहांमध्ये एन्ट्री घेतली तेव्हा तिथे असणाऱ्या लोकांना आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. शाहिदच्या एंत्रीमुळे फॅन्स अक्षरशः वेडे झाले. यांचा एक व्हिडिओ शाहिदने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की, शाहिद चुपचाप चित्रपटगृहांमध्ये येतो आणि त्याला समोर पाहून तिथे असलेले लोकं शॉक होतात आणि ओरडायला लागतात. त्यांच्या आनंदाला पारावर उरत नसल्यचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
शाहिदने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की, फॅन्स त्याचा फोटो काढण्यासाठी त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी धडपड करत आहे. सोबतच त्याला चियर देखील करत आहे. शाहिदने स्वतःहून जात फॅन्सची भेट घेतली. त्याला पाहिल्यावर कोणाच्याही चेहऱ्यावरचा आनंद लपता लपत नव्हता. हा व्हिडिओ शेअर करताना त्याने लिहिले, “जब वी मेट चे १६ वर्ष.” १६ वर्षांनी देखील हा सिनेमा हाऊसफुल्ल पाहून सर्वांनाच सुखद धक्का बसत आहे. या सिनेमासोबत अजून बरेच जुने रोमॅंटिक सिनेमे प्रदर्शित केले गेले आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आदिल तुरुंगात जाताच राखी अन् शर्लिनची पुन्हा झाली मैत्री, पाहा व्हायरल व्हिडिओ
भांड फुटलं रे! स्वरा भास्करने केले समाजवादी पक्षाच्या ‘फहाद अहमद’साेबत लग्न, पाहा व्हिडिओ